Truck driver strike : संप ट्रक चालकांचा... भुर्दंड सामान्यांना; संप अधिक दिवस राहिल्यास नागरिकांची होणार मोठी गैरसोय!




भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : प्रस्तुत हिट अँड रनच्या कायद्यात बदल अथवा रद्द करावा,या मागणी साठी सुरू असलेल्या ट्रक चालकांच्या संपाचा फटका अकोल्यातील घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडर धारकांना बसला आहे. शहरात परवा पासून गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.



परवापासून गॅस सिलेंडर साठी अकोल्यातील नागरिकांची तारांबळ उडाली. गॅस सिलेंडरचा पुरवठा करणाऱ्या भारत पेट्रोलियम , हिंदुस्थान पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल या तिन्ही गॅस कंपनीचा गॅस साठा संपला असल्याचे दिसून येत आहे. 


हिट अँड रण कायद्याच्या विरोधात सुरू असलेल्या ट्रक चालकांचा या संपाचा सामान्य नागरिकांना फटका बसलेल्या दिसून येत आहे. संप अधिक दिवस सुरू असल्यास नागरिकांची मोठी गैरसोय होणार असल्याचे चिन्ह दिसून येत आहे, अश्या प्रतिक्रिया उमटतं आहे.




गायगाव मधील डेपो टँकर चालकांचा पुन्हा सहभाग


देशभरात सुरु असलेल्या मालवाहू वाहनांच्या संपात गायगाव डेपोतील चालकांनी पुन्हा सहभागी झाल्यामुळे जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल तसेच घरगुती व्यावसायिक सिलेंडर साठा संपण्याचा मार्गावर असून ग्रामीण भागात सिलेंडर मिळणे बंद झाले आहे. यामुळे नागरिक, वाहनधारक आणि सामान्य गृहिणींना नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे, दरम्यान गुरुवारी रात्री उशिरापर्यंत डेपोचे टँकरचालक संघटनाचे पदाधिकारी व प्रशासनात संप मागे घेण्याबाबत चर्चा सुरु होती. मात्र संपावर कोणताही तोडगा निघाला नसल्याने संप जारी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. गायगाव येथील तिनही कंपनीतील टँकर चालकांनी मंगळवारी मध्यरात्रीपासून संप पुकारला आहे. त्यामुळे डेपोतून जवळपास १५ जिल्ह्यात जाणारा पेट्रोल व डिझेलचा पुरवठा थांबला. परिणामी नागरिक व वाहनधारक यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.




वाहनचालकांनी संप मागे घ्यावा; जिल्हाधिकारी  यांचे आवाहन 




 

नवीन 'हिट अँड रन' कायदा अद्याप लागू झाला नसून, त्याची अंमलबजावणी सुरू झालेली नाही. विविध संघटनांशी चर्चा केल्यानंतरच या कायद्याच्या अंमलबजावणीबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे केंद्र शासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे अकोला जिल्ह्यातील विविध वाहतूक संघटना तसेच चालक यांनी आंदोलन व संप त्वरित मागे घ्यावा आणि जिल्ह्यातील वाहतूक सुरळीत ठेवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे.



जिल्ह्यामध्ये पेट्रोल, अन्नधान्य आदी अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक सुरू राहण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. त्यात कुणी अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.


प्रशासनाशी सहकार्य करू इच्छिणाऱ्या वाहनचालकांनी अत्यावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी सहकार्य करताना वाहने सुरळीत सुरू राहतील, याची दक्षता घ्यावी. प्रशासन आपल्या पाठीशी आहे. कोणत्याही प्रकारच्या अनुचित घटना जिल्ह्यामध्ये होता कामा नयेत. जिल्ह्यात अत्यावश्यक वस्तूंची कोणतीही अडचण नसून पेट्रोल, डिझेल यांचा पर्याप्त साठा उपलब्ध आहे. नागरिकांना लागणाऱ्या अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहील, असेही जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांनी सांगितले.




आंदोलन अधिक तीव्र


अकोला: 9 तारखेला मध्यरात्रीपासून हिट अँड रन प्रकरणी आंदोलन अधिक तीव्र आंदोलन  करण्याचा निर्णय महाराष्ट्रमध्ये घेण्यात आला असून महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये आंदोलन केले जात आहे. यामध्ये अकोला जिल्हयातील अकोला जिल्हा मोटार मालक-वाहक असोसिएशन अध्यक्ष जावेद खान पठाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू झाले आहे.  

11 जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता हायवे वरील रिधोरा आणि शिवर येथे एकाचवेळी रस्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आले, अशी माहिती अकोला जिल्हा मोटार मालक- वाहक असोसिएशन ,अध्यक्ष जावेद खान पठाण , शहर अध्यक्ष गुड्डू सेठ, अकोला ड्रायव्हर असोसिएशन  अध्यक्ष सैयद वसीम  सह  ट्रक, टँकर चालकांनी दिली आहे .



देशभरात हिट अँड रन प्रकरणी आंदोलन सुरू आहे परंतु सरकार मात्र भूमिकेवरती ठाम आहे, केंद्र सरकारने देशभरातील 25 करोड ड्रायव्हर चालकांचे संघटनांसोबत चर्चा करावी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करू नये. आंदोलन अधिक आक्रमक करण्यात येतं असुन शांततेच्या तसेच लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू ठेवले  जाणार आहे. कोणत्याही प्रकारची हिंसा व कुठेही रहदारीस अडथळा निर्माण होईल अशा प्रकारचे वर्तन होणार नाही शांततेच्या मार्गाने परंतु अधिक आक्रमक व तीव्र आंदोलन करीत  9 जानेवारी पासुन मध्यरात्री पासुन चालक ड्रायव्हिंग स्टिअरिंग सोडले आहे. तसेच 10 जानेवारीला चक्काजाम करण्यासाठी आवाहन केले होते त्यानूसार  10 जानेवारी मध्यरात्री पासुन खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या खाजगी गाड्यांचे चक्काजाम आंदोलन सुरू झाले.






खाजगी प्रवाशी वाहतूक करणाऱ्याना दिले निवेदन


अकोला शहरातून लांब पल्ल्याच्या प्रवाशी वाहतूक करणाऱ्या खाजगी बस मालकांना आणि चालकांना राम लता बिझिनेस सेंटर समोर उभ्या खाजगी बस मालकांना आणि चालकांना अकोला जिल्हा मोटार मालक वाहक असोसिएशन अध्यक्ष जावेद खान पठाण यांच्या नेतृत्वाखाली  त्यांच्या सहकाऱ्यांनी जाऊन निवेदन देऊन विनंती केली आहे. तशीच विनंती लक्झरी बस स्थानक येथेही खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या कार्यालयांना निवेदन दिले. तसेच ट्रक टँकर वाहतूक करणाऱ्या संघटनांनाही निवेदन देण्यात आले आहे. दरम्यान वाशीम बायपास येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. मात्र जुनेशहर पोलिसांनी हजर होऊन पुन्हा वाहतूक सुरळित केली होती.





न्यू किराणा बाजार समिती चालक  


हिट अँड रन कायद्याच्या विरोधात अकोल्यातील अकोला बाळापूर रोडवरील किराणा मार्केटजवळ वाहनचालकांकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.  नव्या कायद्याबाबत संप सुरू झाला आहे. वाहनचालकांकडून स्टिअरिंग छोडो आंदोलन सुरू करण्यात आले आहे.  जुने शहरांतर्गत न्यू किराणा बाजार समिती चालकांनी ‘रास्ता रोको’ आंदोलन केले.  




म्हैसांग रोड पॉईंट 


म्हैसांग रोड पॉईंट येथे प्रदीप देवबाले यांचे नेतृत्वाखाली  धम्मपाल गवई, किसना चव्हाण, गजानन टेके, महादेव बावणे, शुभम सुलताने,  कुंदन कट्यारमल,अवधूत इंगळे, नामदेव डोंगरे, भास्कर पाटेकर, बालू  पिपरे, रवी पाटेकर, संतोष नवलकर,अंकुश नवलकर, रमेश बारब्दे आदी गाडी चालक आणि मालक स्टिअरिंग छोडो आंदोलनात सहभागी झाले होते.







टिप्पण्या