political-maharashtra-rpi : अकोला लोकसभेची जागा आपण प्रकाश आंबेडकरांसाठी सोडणार - ना. रामदास आठवले यांची स्पष्टोक्ती

पत्रकार परिषदेला संबोधित करताना ना. रामदास आठवले, यावेळी प्रदेश सह संघटक अशोक नागदेवे व जिल्हाध्यक्ष सुनील अवचार उपास्थित होते.





भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : येणाऱ्या निवडणुकीत अकोला लोकसभेच्या जागेवर आपण दावा करणार नाही. ही जागा आपण प्रकाश आंबेडकरांसाठी सोडणार असल्याचं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले तथा केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी स्पष्ट केले. 



ना. रामदास आठवले यांचे वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्याप्रति प्रेम पुन्हा उफळून आल्याचं या वक्तव्यावरून दिसून येत आहे. आठवले यांच्या अकोला दौऱ्या दरम्यान त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ना. रामदास आठवले बोलत होते.


आठवले पुढे म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांनी एनडीए मध्ये यावे.ते एनडीए मध्ये आल्यास आपण आपली जागा त्यांना देण्यास तयार आहोत. 

प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीला 12-12-12-12 चा दिलेला फॉर्मुल्याला आठवले यांनी पाठिंबा दिला. 



राज्यसरकारवर बोलतांना मंत्रिमंडळ विस्तारात आम्हालाही मंत्रिपद द्यावं, असं म्हणत विस्तारीत अजित पवार गटाच अधिक विस्तार झालं म्हणत त्यांनी टोला लगावला.



तर एका प्रश्नाच्या उत्तरात, अयोध्या येथील राम मंदिराच्या कार्यक्रमात सोनिया गांधी , मल्लिकार्जुन खर्गे यांनी राजकारण बाजूला ठेऊन यावं, असा सल्लाही आठवले यांनी काँग्रेसला दिला. तर ते या सोहळ्यात उपस्थित न राहिल्यास आगामी लोकसभेत जनतेने काँग्रेसवर बहिष्कार टाकावा, असे आवाहन देखील आठवले यांनी यावेळी केले.


यावेळी महाराष्ट्र प्रदेश सहसंघटक अशोक नागदेवे, अकोला जिल्हाध्यक्ष सुनील अवचार, युवक आघाडी जिल्हाध्यक्ष बुद्धभूषण गोपनारायण आदी पदाधिकारी उपस्थित होते.



टिप्पण्या