political-maharashtra-akola: जितेंद्र आव्हाड यांची भूमिका म्हणजे पक्षाची भूमिका आहे का- राधाकृष्ण पाटील यांचा सवाल






भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: सातत्याने प्रभू श्रीराम, ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या  विरोधात भूमिका मांडणारे जितेंद्र आव्हाड यांची भूमिका म्हणजे पक्षाची भूमिका आहे का ? हे त्यांच्या पक्षश्रेष्टीने स्पष्ट करावी, अशी टीका राज्याचे महसूलमंत्री तथा अकोला जिल्हा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.




ते आज अकोल्यात आले असता प्रसार माध्यमांशी बोलत होते.


राम मंदिराच्या मुद्यावरून त्यांनी शरद पवारांवरही टीका केली. 15 वर्ष सत्तेत असूनही त्यांनी लोकांच्या भावना जुळलेल्या मुद्द्याचा प्रश्न सोडवला नाही आणि आता उलट मुक्ताफळे उधळत आहेत,असे म्हणाले. 



बेळगाव येथील मराठी भाषिकांचा महाराष्ट्राच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलन बद्दल बोलतांना राज्यसरकार मराठी माणसाच्या पाठीमागे असल्याचं त्यांनी सांगितले.



मराठा आंदोलन संदर्भात त्यांनी जरांगे पाटिल यांनी स्वतः आणि लोकांना मोर्चा पासून प्रवृत्त केलं पाहिजे, अशी विनंती सुद्धा केली. तर शिर्डी लोकसभेसाठी पक्षश्रेष्टी निर्णय घेतील असं देखील विखे पाटील म्हणाले.




टिप्पण्या