cricket-vidarbha-beat-odisha: T-20 मालिकेत विदर्भ संघाचा ओडिसा वर 2-0 ने दणदणीत विजय




भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: उडीसा भुवनेश्वर या शहरामध्ये रोटरी क्लबच्या अंतर्गत पॅरामाउंट क्लब ग्राउंड येथे 26 ते 28 जानेवारी दरम्यान एकूण 3 T-20 मालिकेचे आयोजन करण्यात आले होते. परंतु पावसामुळे दोन मॅचेस झाल्या. पहिला मॅच मध्ये विदर्भ संघाने आठ धावांनी ओडिसा संघावर विजय मिळवला. त्यात विदर्भ संघाचा कर्णधार इर्शाद खान मॅन ऑफ दि मॅच ठरला. 




दुसऱ्या सामन्यात विदर्भ संघाने नाणेफेक जिंकून, फलंदाजी करून विशाल 212 धवांचे लक्ष ओडिसा समोर दिले. त्यात मोहंमद अझरुद्दीन याने धमाकेदार नाबाद 46 बॉल मध्ये 100 धावा केल्या. त्यात 8 षटकार व 9 चौकारचा समावेश होता. सोबतच करण मुंद्रे 18 बॉल मध्ये तडफदार 51 धावा केल्या. सोबत कर्णधार इर्शाद खान यांचे 35 धवांचे योगदान मिळाले.


ओडिसा संघाकडून बलराम यांनी 81 धावा करून एकतर्फी झुंज दिली. परंतु त्याला कोणत्याही खेळाडू कडून योग्य साथ मिळाली नाही.  इर्शाद खान व राहुल भोंडेकर प्रत्येकी 3 बळी यांच्या भेदक माऱ्यासमोर तसेच अंकुश वैध आणि गजानन मेहल्डे यांच्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासमोर ओडिसा संघ 173 धावावर गारद झाला. 



मालिकेमध्ये मॅन ऑफ द मॅच - मोहंमद अझरुद्दीन (विदर्भ), बेस्ट बॅट्समन - इर्शाद खान (विदर्भ), उत्कृष्ट क्षेत्ररक्षण - गजानन मेहल्डे (विदर्भ ), उत्कृष्ट गोलंदाज - मोहंमद सोहेल खान (ओडिसा) ठरला.






सर्व खेळाडूंना विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे पूर्व अध्यक्ष अद्वैत मनोहर, सचिव संजय बडकस, शरद पाध्ये, विदर्भ दिव्यांग क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी संजय भोसकर, राजू दूधनकर, राहुल लेकुरवाळे, दिनेश यादव, अशोक काटेकर, धनंजय उपासणी, सचिन पाखरे, गुरुदास राऊत, जनक शाहू, सारंग चाफले, कल्पना सातपुते, धीरज हरडे आदी पदाधिकाऱ्यांनी विदर्भ संघाला शुभेच्छा दिल्या.



टिप्पण्या