cricket news: दर्शन नळकांडे व आदित्य ठाकरे यांची रणजी ट्रॉफी तर गणेश भोसलेची 23 वर्षाखालील विदर्भ क्रिकेट संघात निवड






भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: स्थानिक अकोला क्रिकेट क्लब व विदर्भ क्रिकेट संघटनेचा मध्यमगती गोलंदाज व आक्रमक फलंदाज असा अष्टपैलू क्रिकेट खेळाडू दर्शन नळकांडे व मध्यम गती गोलंदाज आदित्य ठाकरे यांची रणजी ट्रॉफी संघात तर फिरकी गोलंदाज गणेश भोसलेची २३ वर्षाखालील सी. के. नायडू स्पर्धेकरिता विदर्भ संघात निवड झाली आहे. 



दर्शन याने यापूर्वी वयोगट १४, १६, १९, २३ स्पर्धेत विदर्भ तथा मध्यविभाग संघाचे प्रतिनिधित्व केले असून १९ वर्षीय भारतीय संघाकडून इंग्लंड येथे कसोटी सामना तर आशिया कप करिता मलेशिया येथे १९ वर्षीय भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तर सहा वर्षापासून रणजी ट्रॉफी संघाचे प्रतिनिधित्व करित असून आय.पी. एल स्पर्धेत गुजरात संघाचे प्रतिनिधित्व करीत आहे.  




आदित्य ठाकरे मध्यमगती गोलंदाज असून, त्याने सुद्धा यापूर्वी १६, १९, २३ वर्षाखालील विदर्भा व मध्य विभाग संघाचे प्रतिनिधित्व तसेच १९ व २३ वर्षाखालील भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच रणजी ट्रॉफी व इराणी ट्रॉफी संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. विशेष म्हणजे न्युझीलँड  येथे १९ वर्षाखालील झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेचे भारतीय संघाकडून प्रतिनिधित्व केले आहे. 



गणेश भोसले हा उत्कृष्ट फिरकी गोलंदाज असून, यापूर्वी गणेशने १६ व १९ वर्षाखालील विदर्भ संघाचे प्रतिनिधित्व तसेच १६ वर्षाखालील मध्य विभागाचे संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.  विदर्भ संघ इलाईट A ग्रुप मध्ये असून पहिला सामना ५ ते ८ जानेवारीला नागपूर येथे असून २३ वर्षाखालील सी.के. नायडू विदर्भ संघ इलाईट B ग्रुप मध्ये आहे. पहिला सामना ७ ते १० जानेवारी २०२४ नागपूर येथे आहे, अशी माहिती विदर्भ क्रिकेट संघटनेचे जिल्हा संयोजक भरत डिक्कर यांनी दिली.



  

टिप्पण्या