- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
ॲड. नीलिमा शिंगणे जगड
अकोला: महिला या स्वावलंबी झाल्या पाहिजेत. त्या आत्मनिर्भर झाल्या पाहिजेत, यासाठी महिला सशक्तिकरणचा विचार काँग्रेसने राष्ट्राला दिला असून, यामुळेच महिला आत्मनिर्भर झाल्या असल्याचे मत भारतीय युवक काँग्रेसच्या आऊटरीच विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केरळचे आमदार चांडी ओमान यांनी व्यक्त केले.
स्थानीय शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत चांडी ओमान यांनी युवा नेते राहुल गांधी यांच्या संकल्पनेची माहिती दिली.
राष्ट्रातील वातावरण पक्षासाठी पोषक असून, या संदर्भात आपण राष्ट्रीय जनजागरण करीत असून त्याची सुरुवात आपण पातुर या अकोला जिल्ह्यातील तालुक्यापासून केली असल्याचे चांडी यांनी यावेळी सांगितले.
विदर्भात अनेक प्रलंबित प्रश्न जैसे थे असून त्यामध्ये जुन्या पेन्शनचा मुद्दा मोठा महत्त्वाचा आहे. काँग्रेसने जुन्या पेन्शनच्या संदर्भात आपले धोरण पेन्शन धारकांच्या बाजूने ठेवले असून जुन्या पेन्शन धारकांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी काँग्रेस प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
ते म्हणाले, युवकांना युवा नेते राहुल गांधी यांच्या संकल्पनेतील भारत घडवायचा असून राहुल गांधी यांचा समानतेचा संदेश राष्ट्रात पोहोचण्यासाठी आपला विभाग जोमाने कार्य करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
गत दहा वर्षात देशाचा पार बट्ट्याबोळ झाला असून सामाजिक अशांतता मोठ्या प्रमाणात निर्माण झाली असल्याचा आरोपही चांडी यांनी यावेळी केला.
यावेळी आऊटरीच सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ शफिक अहमद, माजी आमदार बबन चौधरी, रवी पाटील अरबट, अनंत गावंडे ,स्वप्निल देशमुख, केरळचे राजेश मुलेसरा, राजस्थानचे रवींद्र दत्त, हरियाणाचे प्रमोद रावल यांच्यासह तशवर पटेल, रेम्बो भाई ,राजू शेठ अहमद आदी सेलचे पदाधिकारी उपस्थित होते.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा