- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
anganwadi-workers-helpers-strike: अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा संप: हजारोच्या संख्येने अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर निघाला धडक मोर्चा
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
ॲड. नीलिमा शिंगणे जगड
अकोला : आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सुरू असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा संप सुरू असून आज हजारोच्या संख्येने अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.
शासनाने यापूर्वी ग्रॅज्युइटी आणि पेन्शनच्या संदर्भातील मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात आंदोलकांना आश्वासन दिले होते, मात्र या संदर्भात अजून कोणताही जीआर न काढल्याने संप पुकारण्यात आला आहे. या संपामुळे शिक्षण व आरोग्य सेवा बाधित होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मानधनवाढ, पेन्शन आणि इतर मागण्याबद्दल कोणतेही आश्वासन दिले नाही. त्यामुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी नाराजी व्यक्त करत हा मोर्चा काढला. दीड हजार रुपयांची मानधनवाढ एप्रिलपासून दिल्यामुळे आता पुन्हा वाढ देता येणार नाही असे कारण देण्यात आले आहे. मात्र ही वाढ अतिशय अपुरी असून आशासेविकांच्या एवढी मानधनवाढ मिळावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा