navjeevan express canceled: आंध्रप्रदेशात मिचॉन्ग चक्रीवादळ; नवजीवन एक्सप्रेस रद्द



   file photo 





ॲड.अमोल इंगळे 

अकोला:मिचॉन्ग चक्रीवादळ किनारी आंध्र प्रदेशला धडकत असल्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वे कडून 144 गाड्या रद्द केल्या आहेत,अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.


यात अकोला मार्ग धावणारी अप-डाउन नवजीवन एक्सप्रेस खालील तारखांना रद्द केल्या आहेत.


12656 चेन्नई सेंट्रल अहमदाबाद नवजीवन सुपरफास्ट एक्सप्रेस चेन्नई सेंट्रल वरून दिनांक 03, 04 व 05 डिसेंबरला सुटणार नाही. 


12655 अहमदाबाद चेन्नई सेंट्रल नवजीवन सुपरफास्ट एक्सप्रेस अहमदाबाद सेंट्रल वरून दिनांक 04, 05 व 06 डिसेंबरला सुटणार नाही.




नागपूर विभागात नॉन इंटरलॉकिंगचे काम


शॉर्ट टर्मिनटेड रेल्वे


१२१०५ मुंबई - गोंदिया विदर्भ एक्सप्रेस दि. ०५.१२.२०२३  ते  १३.१२.२०२३ पर्यंत गोंदिया ऐवजी नागपूरपर्यंतच धावणार आहे. 


१२१०६ गोंदिया मुंबई विदर्भ एक्सप्रेस दि. ०६.१२.२०२३  ते  १४.१२.२०२३ पर्यंत गोंदिया ऐवजी नागपुरातून सुटणार आहे.



११०३९ कोल्हापूर गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस दि. ०४.१२.२०२३  ते  १२.१२.२०२३ पर्यंत गोंदिया ऐवजी नागपूरपर्यंतच धावणार असून, 

 

११०४० गोंदिया कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस दि. ०६.१२.२०२३  ते  १४.१२.२०२३ पर्यंत गोंदिया ऐवजी नागपूरहून प्रवासाला प्रारंभ करेल.





नागपूर विभागात नॉन इंटरलॉकिंगचे काम; अकोला मार्गावर धावणाऱ्या ७ गाड्या रद्द


नागपूर विभागातील राजनांदगाव-कळमना रेल्वे विभागादरम्यान कन्हान स्थानकावर तिसरी लाईन टाकण्यासाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेकडून नॉन इंटरलॉकिंग ब्लॉक घेण्यात येत आहे. या कामासाठी रेल्वे वाहतुकीवर परिणाम होणार आहे.



१२८७० हावडा-सीएसएमटी मुंबई साप्ताहिक एक्सप्रेस ०८.१२.२०२३ रोजी रद्द राहील.


१२८६९ सीएसएमटी मुंबई-हावडा साप्ताहिक एक्सप्रेस १०.१२.२०२३ रोजी रद्द राहील.




२२९०५ ओखा-शालिमार एक्सप्रेस १०.१२.२०२३ रोजी रद्द राहील.


२२९०६ शालिमार-ओखा एक्सप्रेस १२.१२.२०२३रोजी रद्द राहील.



१२८१२ हटिया-एलटीटी (मुंबई) एक्सप्रेस ०८.१२.२०२३ आणि ०९.१२.२०२३ रोजी रद्द राहील.


१२८११ एलटीटी (मुंबई)-हटिया एक्सप्रेस  १०.१२.२०२३ आणि ११.१२.२०२३ रोजी रद्द राहील.



१३४२५ मालदा टाउन सुरत एक्सप्रेस ०२.१२.२०२३ आणि ०९.१२.२०२३ रोजी रद्द राहील.


१३४२६ सुरत-मालदा टाउन एक्सप्रेस ०४.१२.२०२३  आणि ११.१२.२०२३ रोजी रद्द राहील.



१२१०१ एलटीटी(मुंबई)-शालिमार एक्सप्रेस ०८.१२.२०२३, ९.१२.२०२३, ११.१२.२०२३ आणि १२.१२.२०२३ रोजी रद्द राहील.


१२१०२ शालीमार-एलटीटी (मुंबई) एक्सप्रेस १०.१२.२०२३, ११.१२.२०२३, १३.१२.२०२३ आणि १४.१२.२०२३ रोजी रद्द राहील.



२०८२३ पुरी - अजमेर ट्रेन सेवा ०४.१२.२०२३, ०७.१२.२०२३ आणि ११.१२.२०२३ रोजी रद्द राहील.


२०८२४ अजमेर-पुरी ट्रेन सेवा ०७.१२.२०२३, १२.१२.२०२३ आणि १४.१२.२०२३ रोजी रद्द राहील.



२०८२२ संत्रागाची-पुणे हमसफर एक्सप्रेस ०९.१२.२०२३ रोजी रद्द राहील.


२०८२१ पुणे - संत्रागाची हमसफर एक्सप्रेस ११.१२.२०२३ रोजी रद्द राहील.






नागपूर विभागातील नॉन इंटरलॉकिंग काम; पुरी-अजमेर-पुरी एक्सप्रेसच्या प्रत्येकी ३ फेऱ्या रद्द



मार्ग: रायपूर, नागपूर, अकोला, भुसावळ, अहमदाबाद


नागपूर विभागातील राजनांदगाव - कळमना रेल्वे विभागादरम्यान कन्हान स्थानकावर तिसरी लाईन टाकण्यासाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेकडून नॉन इंटरलॉकिंग ब्लॉक घेण्यात येत आहे. या कामासाठी रेल्वे वाहतुकीवर परिणाम होणार आहे. अकोला मार्ग धावणारी पुरी - अजमेर - पुरी एक्सप्रेसच्या प्रत्येकी ३ फेऱ्या खालील तारखांना रद्द राहतील. 


ट्रेन क्रमांक 20823, पुरी - अजमेर ट्रेन सेवा 04.12.23, 07.12.23 आणि 11.12.23 रोजी रद्द राहील. 


ट्रेन क्रमांक 20824, अजमेर-पुरी ट्रेन सेवा 07.12.23, 12.12.23 आणि 14.12.23 रोजी रद्द राहील.





अमरावती - मुंबई - अमरावती महापरिनिर्वाण दिन विशेष रेल्वे


प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता महापरिनिर्वाण दिन निमित्त मध्य रेल्वे आणखी २ अनारक्षित विशेष फेऱ्या चालवणार आहे. 


०१२१८ अमरावती- मुंबई अनारक्षित विशेष

दि. ०५/१२/२३ रोजी अमरावती येथून १७.४५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी ०५.२५ वाजता  पोहोचेल.


०१२१७ मुंबई अमरावती अनारक्षित विशेष

दि. ०७.१२.२३ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ००.४० वाजता सुटेल आणि अमरावती येथे त्याच दिवशी १२.५० वाजता पोहोचेल.


थांबे: बडनेरा, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, दादर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई असे राहतील.





टिप्पण्या