Indian railways: जीआरपी कर्मचारी गौतम शिरसाट यांच्या सतर्कतेमुळे वाचला प्रवाशाचा जीव




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : महापरिनिर्वाण दिनी प्रवाशांच्या सोयीच्या दृष्टीने रेल्वे विभागातर्फे मुंबईला जाणाऱ्या आणि परतणाऱ्या अनुयायांसाठी विशेष गाडी चालवली जात आहे. गर्दीच्या वेळी आणि इतर वेळी सुध्दा ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना काही मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यास सांगितले जाते परंतु प्रवासी या सूचना कडे दुर्लक्ष करतात आणि आपला जीव धोक्यात घालतात. मात्र प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पोलीस विभागाकडून शिपाई तैनात केले जातात. बडनेरा रेल्वे स्थानकावर तैनात पोलीस कर्मचारी गौतम शिरसाट यांच्या सतर्कतामुळे एका 62 वर्षीय प्रवाशाचा जीव वाचला.  



मुंबईहून नागपूरला जाणारी 02155 ही गाडी फलाट क्रमांक 2 वर थांबली.  या ट्रेनने प्रवास करणारे नागपूरचे रहिवासी 62 वर्षीय हरिसिंग देवसिंग हे चहा पिण्यासाठी प्लॅटफॉर्मवर उतरले होते.  चहा घेत असतानाच ट्रेन पुढच्या स्थळी निघाली होती. गाडी चालत असल्याचे पाहून त्या वृद्धाने घाईघाईने रेल्वेत चढण्याचा प्रयत्न केला, मात्र ट्रेनने वेग पकडला होता. दरम्यान, वृद्धाचा हात गाडीच्या हँडलमध्ये अडकल्याने जवळपास 50 फूट ते फरफटत गेले. दरम्यान हे दृष्य पाहून तिथे तैनात असलेले पोलीस कर्मचारी गौतम शिरसाट यांनी वृध्द व्यक्तीस वाचविण्यासाठी धाव घेतली.आणि  रेल्वे थांबविण्यासाठी साखळी ओढा, साखळी ओढा. असे ओरडून प्रवश्याना सांगत होते. पोलीस कर्मचारीचा आवाज ऐकून गार्डने तात्काळ इमर्जन्सी ब्रेक लावल्याने ट्रेन काही अंतर गेल्यावर थांबली.  पोलीस कर्मचारी गौतम सिरसाट यांच्या सतर्कतेमुळे एका वृद्धाचा जीव वाचला.  



गेल्या दोन महिन्यांपूर्वी अशाच एका कुटुंबाचा जीव वाचवण्यात रेल्वे स्थानकावरील पोलीस कर्मचारी गौतम सिरसाट यांना यश आले होते.





टिप्पण्या