health-akola-dist-alert-mode: अकोला जिल्हयातील सर्व आरोग्य संस्था अलर्ट मोडवर; नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी- जिल्हा प्रशासनाचे आवाहन





भारतीय अलंकार न्यूज 24

अकोला : अकोला जिल्हयात महानगरपालीका कार्यक्षेत्रातील कोरोनाचा एक रुग्ण ७ डिसेंबर २०२३ रोजी आरटीपीआर चाचणीमध्ये बाधीत आला. त्याचे जिनोम सिक्वींसीगचे चाचणीमध्ये कोरोनाच्या जेएन१ हया नविन उपप्रकारामध्ये बाधीत असल्याचे २४ डीसेंबर २०२३ रोजी आढळुन आला असुन, सदर रुग्ण सुस्थितीत असुन बरा झाला आहे. कोरोनाचा जेएन१ हा नविन उपप्रकार घातक नसला तरी नागरीकांनी काळजी घ्यावी. नागरीकांनी घाबरून न जाता कोविड अनुरुप वर्तणुकीचे पालन करावे.


जेएन १ या पार्श्वभुमीवर  जिल्हाधिकारी, अकोला  मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. अकोला, आयुक्त, महानगरपालिका अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हयातील सर्व आरोग्य संस्था सतर्क राहुन अलर्ट मोडवर काम करीत आहेत. जिल्हयात  २७ डिसेंबर २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत २७ आरटीपीसीआर चाचण्या व ११४९ रॅपीड असे एकुण ११७६ कोविड चाचण्या करण्यात आल्यात.


जिल्हयात केवळ तिन रुग्ण बाधीत असल्याचे आढळुन आले आहे. जिल्हयात तिन सक्रीय रुग्ण असुन जिल्हयातील एक रुग्ण (वय ४० वर्ष लिंग स्त्री) हा जिल्हा अमरावती येथे बाधीत असल्याचे आढळून आला असुन तो अकोला महानगरपालीका भागातील असुन उर्वरीत दोन रुग्ण (वय २८ वर्ष व वय ४२ वर्ष दोनही लिंग पुरुष) हे पंचगव्हाण ता. तेल्हारा येथील रहिवासी आहेत. या तिनही रुग्णांना सौम्य लक्षणे असल्याने ते गृहविलगीकरणामध्ये आहेत. आरोग्य यंत्रणा त्यांच्यावर नियंत्रण ठेवुन आहेत.


जिल्हयात प्राधान्याने श्वसन आजार, जोखमी व्यक्ती याची वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून तपासणी करण्यात येत आहे. तसेच  २७ डिसेंबर २३ पासुन ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एकुण प्रगतीपर ६१४ रॅपीड चाचण्या करण्यात येवुन त्यामध्ये दोन रुग्ण बाधीत असल्याचे आढळुन आले. तर जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व ग्रामीण रुग्णालये व उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय येथे ५३५ रॅपीड चाचण्या करण्यात येवुन त्यामध्ये एकही रुग्ण बाधीत आढळुन आला नाही. तर महानगरपालीका कार्यक्षेत्र व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला येथे एकुण २७ आरटीपीसीआर चाचण्या करण्यात येवुन त्यामध्ये एक रुग्ण (वय वर्ष ३८ लिंग स्त्री) बाधीत आढळुन आला आहे. हा रुग्ण ता. मोर्शी जि. अमरावती येथील आहे. सदरची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक, अकोला व जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प. अकोला यांच्याकडून प्राप्त झाली आहे.


नविन वर्षाचे आगमन होणार असल्यामुळे त्याचे स्वागत करण्यासाठी नागरीक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. गर्दीच्या ठिकाणी कोविड अनुरुप नियंमाचे पालन करणे व काळजी घेणे आवश्यक आहे. जोखमीच्या व्यक्तींनी अशा गर्दीच्या ठिकाणी जावु नये. तसेच सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी यासारखी लक्षणे असल्यास त्वरीत नजिकच्या आरोग्य संस्थेत तपासणी करुन घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.

टिप्पण्या