court news: खुनाच्या आरोपातून आरोपीची निर्दोष मुक्तता

               आरोपी तर्फे वकील 



भारतीय अलंकार 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: पोळा सणाच्या करीच्या दिवशी मद्यपान व जुगार नंतर झालेल्या भांडणात आपल्या सवंगड्याची हत्या करून प्रेत नदीपात्रात फेकल्याचा आरोप असणाऱ्या आरोपीची जिल्हा सत्र न्यायालयाने साक्षीदारांच्या वक्तव्याच्या विसंगतीमुळे निर्दोष मुक्तता केली. 



मुर्तीजापुर तालुक्यातील सोनाळा गावात पत्ते खेळण्यास गेलेला उनखेड येथील रहिवासी संदीप आनंदराव घोरमोडे हा कमळगंगा नदीच्या पुलावर मृतावस्थेत आढळून आला. मृतक संदीप यास पत्ता खेळणाऱ्या मृतकाच्या गावातीलच दिलीप उत्तम वानखडे याने मारहाण करून त्याची हत्या करीत प्रेत नदीमध्ये टाकले असल्याची फिर्याद मृतकाची आई ग. भा. उर्मिला आनंदराव घोरमोडे  हिने 3 सप्टेंबर 2019 रोजी माना पोलीस ठाण्यात दिली होती. 




पोलिसांनी तपास करीत या घटनेतील आरोपी दिलीप उत्तम वानखडे याच्यावर गुन्हा र न 162/2019 अन्वये भादवि कलम 302, 201 अन्वये गुन्हा दाखल करीत आरोपीस अटक केले. पोलिसांनी तपास करीत दोषारोप पत्र न्यायालयात सादर केले.




सेशन केस क्रमांक 200/ 2019 नुसार या  प्रकरणाची सुनावणी चौथे जिल्हा सत्र न्यायाधीश व्ही. बी. गव्हाणे यांच्या न्यायालयात झाली. न्यायालयाने या प्रकरणात एकंदर  सात साक्षीदार तपासले. यात साक्षीदारांच्या बयानावरून प्रथमदर्शी मृतक हा शेवटच्या क्षणी आरोपी सोबत होता हे सिद्ध होऊ शकले नाही. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर व साक्षीदार तपासत न्यायालयाने यातील बारकावे लक्षात घेता आरोपी दिलीप वानखडे याची या खटल्यातून निर्दोष मुक्तता केली. आरोपीची बाजू ॲड. मो. इलियास शेखानी यांनी मांडली. त्यांना ॲड. प्रगती मेश्राम यांनी सहकार्य केले.

टिप्पण्या