court news: सिगारेट गोदामावर दरोडा प्रकरणातील फरार आरोपी कृष्णाचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजुर





भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: जुने शहरातील बहुचर्चित सिगारेट गोदामवर दरोडा प्रकरण उघडकीस आल्यापासून फरार झालेला आरोपी कृष्णा मलिये याचा अटकपूर्व जामीन अर्ज  मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपिठने अटी व शर्तीच्या आधारे मंजुर केला आहे. 



याबाबत सविस्तर वृत्त असे की, 28 मे 2023 रोजी देवानंद खंडारे यांनी तक्रार दिली होती की, ते नंदलाल मोटवाणी यांच्या सिगारेट गोदामवर चौकीदारी करीत असतांना अचानक 27 मे 2023 च्या मध्य रात्री 2 वाजताच्या सुमारास तिन ईसम त्याच्याकडे आले व त्याचे हातपाय बांधुन त्याला जिवे मारण्याची धमकी देवुन राय अँड संन्स नावाचे बोर्ड असलेले गोदामचे शेटर वाकुन आतमध्ये प्रवेश करुन मोठे मोठे सिगारेट कार्टुन रु. 50 लाखाचे व गोदाम समोर उभी असलेली Tata 30 AV 0515 गाडी ज्याची किंमत रु. 1,50,000/- असे एकुण 70,23,730/- चे चोरुन पळून गेले. अश्या तक्रारीवरुन भांदवी च्या कलम 392, 395, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.


या गुन्हात पोलीसांनी आतिष सुनिल मलिये, श्याम ताथोड, भावेश भिरड, नागेश कुटाफळे रा. जुने शहर अकोला यांना अटक करुन आरोपींकडून रु. 43,77,850/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला व त्यावेळेस पासून आरोपी कृष्णा सुनिल मलिये हा फरार होता. दरम्यान आरोपी कृष्णा मलिये याने अटकपूर्व जामीन अर्ज ॲड. रितेश तहलिया व ॲड. पप्पु मोरवाल यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालय खंडपिठ नागपुर येथुन दाखल केले होते. त्यास तपासी अधिकारी यांनी विरोध दर्शवुन सांगितले होते की, ऊर्वरीत लाखो रुपयाचे माल कृष्णा मलिये कडून जप्त करणे आहे व तो सहा ते सात महिन्यापासुन फरार आहे. तसेच सिसि टीव्ही फोटेज मध्ये घटनास्थळी कृष्णा मलिये हजर असल्याचे दिसत असल्याने अश्या परिस्थितीत त्याचे पोलीस रिमांन्ड घेणे गरजेचे आहे. त्यास कृष्णा मलियेच्या वकीलांनी विरोध दर्शविले व त्यामुळे स्पष्टपणे सांगितले की, पोलीसांनी कृष्णा मलिये याला या प्रकरणात खोटे फसविले आहे. दोघांचाही युक्तीवाद ऐकुन विद्यमान मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपिठने आरोपी कृष्णा मलिये अटकपूर्व जामीन अर्ज अटीं व शर्तीच्या आधारे मंजुर केले. 



या प्रकरणात ॲड. रितेश तहलियानी व ॲड. पप्पु मोरवाल यांना ॲड. प्रविण तायडे, ॲड. अक्षय दामोदर, ॲड. प्रतिक वाघ, राधेश्याम अवारे, सृष्टी ठाकरे, गणेश खेडकर, सौरभ डहाके, कश्यप अहिर, नंदन ठाकरे, मिताली लखवानी, सुनिल सरदार, प्रणव वानखडे इत्यादीनी मोलाचे सहकार्य केले.


टिप्पण्या