akola mnc: टॅक्स फक्त म.न.पा टॅक्स कर्मचारी जवळ जमा करा; शिवसेनेचे अकोला शहरवासियांना आवाहन




ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: स्वाती कंपनीच्या कोणत्या ही व्यक्तीला टॅक्स देऊ नये. अकोला शहर वासियानी टॅक्स महापालिका कर्मचारी यांच्याकडे द्यावा अथवा महापालिका कर विभागात भरावा, असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने केले. याविषयी जनजागृती करण्यासाठी शिवसेना पदाधिकारी यांनी स्थानिक व्यापारी व नागरिकांच्या भेटी घेतल्या. या मोहिमेस सकाळी आराध्य दैवत श्रीराजराजेश्वराचे दर्शन घेवून प्रारंभ करण्यात आला.


व्यापाऱ्यांच्या भेटी घेतल्यानंतर महापालिकाचा दिशेने कूच केली. रद्द करा…रद्द करा… स्वाती कंपनी टॅक्स कंत्राट रद्द करा…अश्या घोषणा देत शिवसेनाचे (ठाकरे गट) कार्यकर्ते आणि पदाधिकारी महापालिकेत धडकले. संबंधीत अधिकाऱ्यांशी चर्चा केली.



 


शिवसेना अकोला पक्षाच्या वतीने 

गुरूवार 7 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता अकोल्याचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर महाराजांचे दर्शन घेऊन

‘अकोला महानगरपालिका मध्ये भाजपाचा शेकडो कोटीच्या भ्रष्टाचाराची पोलखोल’ मोहिमेला सुरूवात करण्यात आली.



श्री राजरजेश्वर महाराजांचे दर्शन घेऊन

श्री राजरजेश्वर मंदिर ,जयहिंद चौक, मोठा पुल, मोठा राम मंदिर,कपडा बाजार, सराफ बाजार,चुडा मार्केट,जाजू मार्केट, दाना बाजार,खेतान गल्ली,लोहा बाजार गांधी चौक,तहसील चौक, चोपाटी, कोठरी बाजार, राम द्वार,कृष्ण द्वार, काला चबुतरा,ओपन थेटर,तिलक रोड, अलंकार मार्केट येथे अकोलांच्या व्यापारी लोकांना भेटून शिवसेनेच्या वतीने म.न.पा टॅक्स कंत्राट जनजागृती करण्यात आली. 




यावेळी शिवसेना पश्चिम शहर प्रमुख राजेश मिश्रा,अकोला पूर्व शहर प्रमुख राहुल कराळे, विकास पागृत, मुकेश मुरुमकार, अतुल पवनीकर,गजानन बोराळे, तरुण बागेरे, अभय खुमकर, जोस्ना चोरे, सुनीता श्रीवास, मंजुषा शेळके, शुभांगी किंनगे, वर्षा पिसोडे, विशाल घरडे, नितीन मिश्रा,नितीन तठोड, ज्ञानेश्वर गावंडे, नितीन ताकवाले, अनील परचुरे,आशुतोष शेगोकार, बाळू ढोले पाटील,शरद तूरकर, किरण ठाकरे, मोंटू पंजाबी, प्रकाश वानखडे, किरण येलवणकर, अंकुश सित्रे, बबलू उके, सागर कुकडे, आकाश राऊत,निवृत्ती तिजारे,रामेश्वर पडुळकर, सतीश नागदिवे,अक्षय नागापुरे, रुपेश ढोरे, राजेश इंगळे,रोशन राज, शुभम इंगळे, जय इगोले, अभिजित शिंदे, शैलेश अंदुरेकर,मनोज बाविस्कर,संतोष रणपिसे,छोटू धुर्वे,रवी अवचार, गणेश पोलाखडे, विश्वास शिरशाट, देवा गावंडे,रुद्राक्ष राठोड, गणेश मालटे, प्रमोद धर्माळे, दीपक माटे, छोटू पाटील,आशु तिवारी,संतोष टापरे, अजय भटकर, सुरेश इंगळे,श्याम रेडे, गणेश बुंदले, गोपाल लवाळे,गोपाल बिलेवार, अर्जुन शिरसागर, मंगेश पावले, योगेश कटियारमल, आशिष इंगळे, गोटू मोडवे, प्रमोद माने, रवी गायकवाड, राधे श्रीवास, दशरथ मिश्रा,भगवान गायकवाड, पवन शाईवाले, मंगेश ढवळे, रवी मडावी, नीलिमा तिजारे, रुक्मणी जाधव, राखी पटेकर, रंजना हरणे, वर्षा पिसे, लिला देव आदी पदाधीकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या