- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
alankar-market-crime-news-a: अलंकार मार्केटमध्ये चोरीच्या प्रयत्नानंतर दुकानदार व मजुरांवर हल्ला; कर भरूनही व्यापाऱ्यांना सुरक्षा नाही, राडा घालणाऱ्यांनी मागितली माफी
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
लक्षवेधी मुद्दा
व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण; आरोपींवर कठोर कारवाई व बाजारात सुरक्षा वाढवण्याची अकोला मेटल मर्चेंट असोसिएशनची मागणी
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : शहरातील अलंकार मार्केट परिसरात व्यापाऱ्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण करणारी धक्कादायक घटना घडली आहे. ICICI बँकेकडे जाणाऱ्या गल्लीत, सिंधू बँकेजवळील एका दुकानासमोर ठेवलेला कूलर चोरी करण्याचा प्रयत्न एका व्यक्तीने केला. दुकानदाराने त्याला रंगेहात पकडताच परिस्थिती अचानक तणावपूर्ण बनली होती. मात्र व्यापारी संघटनेच्या मागणी नंतर या घटनेतील उपद्रवी व्यक्तींनी या संपूर्ण प्रकाराबाबत माफी मागितली असून, भविष्यात त्यांच्या कडून असे प्रकार होणार नाहीत, अशी ग्वाही पोलिसांसमोर दिली असल्याचे कळते.
चोरीचा प्रयत्न करणाऱ्या त्या व्यक्तीस पकडल्यानंतर दुकानदारांनी त्याला विचारणा केल्यानंतर त्या व्यक्तीने आपल्या काही साथीदारांना बोलावले. काही वेळातच त्याचे अनेक साथीदार घटनास्थळी आले. त्यामध्ये काही महिलांचाही समावेश होता. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, काही जणांच्या हातात शस्त्रेही होती, त्यामुळे संपूर्ण बाजारात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुरुवातीला त्या लोकांनी आपल्या साथीदारालाच मारहाण करण्यास सुरुवात केली. मात्र काही वेळातच त्यांनी जवळील दुकानदार, कर्मचारी आणि मजुरांवर हल्ला चढवला. या घटनेमुळे बाजारात मोठी धावपळ आणि घबराट निर्माण झाली होती.
घटनेदरम्यान काय घडले?
दुकानांवर दगडफेक करण्यात आली.
दुकानदारांना शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली.
बाजारात भीती आणि अफरातफरीचे वातावरण निर्माण झाले.
काही दुकानदारांना दुकाने जाळून टाकण्याची धमकी देण्यात आली.
एका साथीदाराला घरातून पेट्रोल आणण्यास सांगितल्याची माहिती.
या प्रकारामुळे व्यापाऱ्यांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रशासनाकडे व्यापाऱ्यांच्या प्रमुख मागण्या
अकोला मेटल मर्चेंट असोसिएशनने प्रशासनाकडे तातडीने खालील मागण्या केल्या आहेत:
घटनेतील सर्व आरोपींची ओळख पटवून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी.
अलंकार मार्केट परिसरात पोलीस गस्त वाढवावी.
व्यापारी, दुकाने आणि तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची सुरक्षा सुनिश्चित करावी.
कर भरूनही व्यापाऱ्यांना सुरक्षा नाही
व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, अलंकार मार्केटमधील बहुतांश व्यापारी नियमितपणे आयकर, जीएसटी, कॉर्पोरेट कर तसेच इतर स्थानिक कर भरतात. मात्र त्यानंतरही बाजारात पुरेशी सुरक्षा, स्वच्छता आणि मूलभूत सुविधा उपलब्ध होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
व्यापाऱ्यांना एकजुटीचे आवाहन
या घटनेच्या निषेधार्थ अलंकार मार्केटमधील सर्व व्यापाऱ्यांनी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. व्यापाऱ्यांनी आपापसात चर्चा करून एक वेळ निश्चित करावी आणि प्रत्येक दुकानातून किमान एक प्रतिनिधी रामदास पेठ पोलीस ठाण्यात जाऊन सामूहिक तक्रार दाखल करावी, असे आवाहन असोसिएशनने केले होते.
तसेच हा मुद्दा पोलीस प्रशासन आणि माध्यमांसमोरही गंभीरतेने मांडण्याचे आवाहन करण्यात आले आहे, जेणेकरून भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत.
दरम्यान, यापूर्वी अलंकार मार्केट मध्ये एकाचं रात्री नऊ ते दहा दुकाने फोडून चोरीची मोठी घटना उघडकीस आली होती. यानंतर यावेळी ही गंभीर घटना घडली आहे. अलंकार मार्केट येथे दैनंदिन आर्थिक देवाण घेवाण मोठ्या प्रमाणात होत असतात. खरेदी आणि विक्री साठी दररोज येथे मोठ्या संख्येने व्यापारी वर्ग आलेला असतो. व्यापारी वर्ग असुरक्षित राहिल्यास आर्थिक गणित बिघडण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे अकोला जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन व मनपा प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेवून व्यापारी वर्गाला सुरक्षा प्रदान करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
Akola Metal Merchant Association
Akola News
Akola Police
Alankar Market
Business Safety
Crime News
Maharashtra News
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा