morna river akola city: संध्याकाळी मोर्णा नदीकाठी एक तास उभे रहा आणि मिळावा एक लाख रुपये बक्षीस; माजी महापौर यांनी मनपा अधिकाऱ्यांना केले खुले आव्हान

file photo 


अकोलेकरांच्या स्वास्थ्यकडे लक्ष देण्यासाठी कोणाकडे वेळ आहे काय? माजी महापौर मदन भरगड यांचा सवाल 


संध्याकाळच्या वेळेस मोरना नदीच्या काठाजवळ अकोला मनपाच्या कोणत्या ही अधिकाऱ्यांनी १ तास उभ राहुन दाखवल्यास १ लाख रूपयाचे बक्षीस देणार -  माजी महापौर मदन भरगड


          माजी महापौर मदन भरगड 



भारतीय अलंकार न्यूज 24

अकोला: अकोला महानगर पालिका महाराष्ट्रा मधील सर्व महानगरपालिका पेक्षा जास्त लावलेला मालमत्ताकराची वसूली अकोला शहराच्या नागरिकांन कडून खाजगी कंपनी स्वाति इंड्रस्ट्री कडून दादागीरी करून घेत आहे. त्याच अकोलेकरांच्या स्वास्थाकड़े अकोला मनपाचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे,असे आरोप माजी महापौर व प्रदेश कांग्रेसचे सचिव मदन भरगड यांनी केले आहेत.



मागील काही दिवसा पासून अकोला शहरात धूळीचे प्रमाण खुप जास्त वाढल्यामुळे अकोला शहराच्या हवेतिल गुणवत्ता खुप खराब झाली आहे, महाराष्ट्रात मुंबई नंतर हवेतिल गुणवत्ता खराब झालेला अकोला शहर हा दुसऱ्या क्रंमाकाचा शहर आहे की ज्याच्या हवे मधील प्रदुषणाचे प्रमाण खुप वाढलेले आहे, याचे  नागरिकांच्या स्वास्थ्यवर खुप जास्त वाईट परिणाम होत आहे. परन्तु, अकोला मनपाचे याकड़े पूर्णपणे दुर्लक्ष आहे. अकोला शहराच्या हवेतिल वाढलेल्या खराब गुणवत्ता कमी करण्या साठी मनपा कोणतेही प्रयत्न करतांना दिसत नाही आहे, असे मत भरगड यांनी मांडले आहे.



अकोला शहराच्या मध्यभागी असलेल्या मोरना नदीमधील जलकुंभी वाढल्यामुळे अकोला शहरात डासांचा प्रादुर्भाव खुप जास्त वाढलेला आहे. मोरना नदिकाठी असलेल्या वस्ती खोलेश्वर, राजपूतपूरा, कमला नेहरूनगर, अनिकट, गीतानगर, शालिनी व रीगल टॉकीजच्या मागे, निमवाड़ी, गुलजारपूरा या वस्त्यातील व या वस्त्याला लागून असलेल्या अनेक वस्त्यामधे राहणारे लाखो नागरिक मच्छरामुळे खुप त्रस्त आहे, कितीही मच्छर अगरबत्ती लावल्यावर नागरीक रात्रिस आपल्या घरात शांतपणे झोपू शकत नाही. संध्याकाळच्या वेळेस या वस्त्यामधे मनपाचे कोणत्या ही अधिकाऱ्यांनी १ तास उभ राहून दाखवल्यास त्यांना मी १ लाख रुपयाचे बक्षीस देणार, असे खुले आव्हान माजी महापौर मदन भरगड यांनी केले आहे. 

वाढलेल्या मच्छर व धुळीमुळे अकोला शहरात मलेरिया, डेंगू, चिकनगुनिया सारखे आजारांचे प्रमाण खुप जास्त वाढले असल्याचे भरगड म्हणाले.


   File photo 

    


अकोला शाहरांच्या नागरिकांचे स्वास्थ्यकड़े दुर्लक्ष करणाऱ्या अकोला मनपाला अकोलेकरांकडून कर वसूली करण्याचे कोणतेही नैतिक अधिकार नाही. मनपा नागरिकांकडून टैक्सची वसूली करते तेंव्हा त्यांना प्राथमिक सुविधा पुरविण्याची जवाबदारीही मनपाची असते. परन्तु मनपा आपले कर्तव्य पार पाडताना दिसत नाही.

अकोला शहरातील हवेतिल खराब झालेली गुणवत्ता व मच्छरांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी अकोला मनपाने योग्य ती कार्यवाही युद्धस्तर लवकर सुरु करावी, अन्यथा मनपा विरुद्ध जनआंदोलन सुरु करण्यात येणार आहे,अशी चेतावणी माजी महापौर तथा प्रदेश कांग्रेस सचिव मदन भरगड यांनी दिली आहे.


टिप्पण्या