Diwali 2023: आज सायंकाळी घरोघरी लक्ष्मीपूजन; पूजनासाठी प्रदोष वेळ सर्वोत्तम

  file image 



भारतीय अलंकार न्यूज 24

अकोला: दिवाळीच्या सणाला सुरुवात झाली असून सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवाळीतील सगळ्यात महत्त्वाचा दिवस लक्ष्मी पूजन. यादिवशी देवी लक्ष्मीची मनोभावे पूजा अर्चना केली जाते. तिचा आशिर्वाद आपल्यावर सदैव राहावा, अशी प्रार्थना केली जाते. आनंदाचा उधळण करणारा मांगल्यपूर्ण दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा लक्ष्मीपूजन हे आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला साजरे केले जाणार आहे. म्हणजेच आज रविवार १२ नोव्हेंबर रोजी लक्ष्मी पूजन घरोघरी आणि व्यापारी प्रतिष्ठान मध्ये केल्या जाणार आहे.


  File image 



यावर्षी लक्ष्मीपूजनाला प्रदोष वेळ सर्वोत्तम असल्याचे अकोला पुरोहित संघाने सांगितले आहे. तिथी मध्ये घट बढ असल्याने दिवाळीचे दिवस विवादित राहणार आहे. निर्णय सिंधू अनुसार,  लक्ष्मीपूजन सुध्दा १२ नोव्हेंबर रोजी करण्यात येत आहे. पूजनासाठी प्रदोष वेळ अति महत्वपूर्ण असून लक्ष्मीपूजनसाठी  संध्याकाळी ०५:४० पासून रात्री ०८ : ४० पर्यंत प्रदोष वेळ राहणार आहे.

स्थिर लग्न वृश्चिक सकाळी ०६:५७ पासून ०९:०८ पर्यंत राहणार आहे.

कुंभ लग्न दुपारी ०१:०२ पासून ०२:३८ पर्यंत आहे. लग्न वृषभ सायंकाळी ०५ :५३ ते ०७:५२पर्यंत आहे. सिंह लग्न रात्री १२:१९ पासून ०२:२८ पर्यंत आहे. चौघडी सकाळी ०७:५५ पासून ०९:१८ चंचल,

लाभ सकाळी ०९:१८ पासून १०: ४० पर्यंत. अमृत वेळ सकाळी १०:४२ पासून १२:०६ पर्यंत.

दुपारी शुभ ०१:३० पासून ०२: ५८ पर्यंत. शुभ संध्याकाळी ०५:४१ पासून ०७:१७ पर्यंत. अमृत रात्री ०७:१७ पासून ०८: ५४ पर्यंत.

चंचल रात्री ०८: ५४ पासून १०:३० पर्यंत. अभिजीत सकाळी ११:४४ पासून १२:२८ पर्यंत राहील.


  File image 




दुकान बंद करण्यासाठी मुहूर्त रात्री दहा वाजता व रात्री तीन वाजताचा आहे. गादी मुहूर्त १२ नोव्हेंबर तारखेच्या कोणत्याही मुहूर्तावर  करावे. कलम मध्ये शाई भरणेसाठी चंचल चौघडी योग्य आहे.




दुकान उघडणेसाठी १४ नोव्हेंबर रोजी सकाळी ०९:१९ पासून ०१: ३० पर्यंत अभिजीत मुहूर्त सह दुकान उघडण्याचे मुहूर्त उत्तम असल्याचे सांगण्यात आले आहे. 





निर्णयसिंधू ,व्रत राज, महाराष्ट्रीयन पंचाग, वल्लभ मनीराम, निर्णय सागर काशी आदी पंचांगाचा प्रयोग करुन लक्ष्मी पुजन मुहुर्त काढण्यात आल्याचे पंडित प्रमोद तिवारी यांच्या सह राजू शर्मा, भैरव शर्मा, संजय तिवारी, श्याम अवस्थी, रमेश आडीचवाल, आलोक शर्मा, पंडित रवी कुमार शर्मा यांनी सांगितले. 




टिप्पण्या