Akola Municipal Corporation: स्थानिक भाजप कार्यकर्त्यांना भ्रष्टाचार करण्यासाठीच स्वाती कंपनीला मनपाने दिला कंत्राट - शिवसेनाचा (उबाठा गट) आरोप





ठळक मुद्दे 

महानगर पालिकाने स्वाती कंपनीला कर वसुलीचा ठेका देऊन मनपा चे १३ कोटी रुपयांचे नुकसान केले


नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि मनपाचे आर्थिक नुकसान वाचविण्यासाठी  तो करार तात्काळ रद्द करा 




भारतीय अलंकार न्यूज 24

अकोला:  महानगर पालिकामध्ये प्रशासक असले तरीही या प्रशासकांना केंद्रात, राज्यात आणि मनपात पुर्वी असलेल्या भाजपने दवाबात घेऊन  केवळ स्थानीक भाजप कार्यकर्त्यांना भ्रष्टाचार करण्यासाठीच स्वाती कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे. स्वाती कंपनीने २१ऑगस्ट २३ पासून शहरांतील नागरिकांकडून कर वसूलीला सुरुवात केली असली तरीही आतापर्यंत केवळ ५ कोटी रूपयेच वसुली केली आहे. त्यामुळें मनपाचे आतापर्यंत १३ कोटी रुपयांचे नुकसान केले आहे. स्वाती कंपनीचे कर्मचारी फक्त नागरीकांना कर वसुलीसाठी धमक्या देत आहेत. त्यामुळे नागरीकांना त्रास देणारी आणि मनपाचे आर्थिक नुकसान करणाऱ्या स्वाती कंपनीचा कंत्राट तात्काळ रद्द करण्यात यावा, अशी मागणी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे शहर प्रमुख राजेश मिश्रा यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.



स्वाती कंपनीच्या कंत्रादारांकडून अकोला महानगर पालिकाचे कर्मचारी वापरून वसूली करीत आहेत. मनपाचे कर्मचारी वापरायचे होते तर स्वाती कंपनीला कंत्राट दिला कश्यासाठी? या कंत्राटदारांकडून आतापर्यंत केवळ ५ कोटी रूपये वसूल केले आहेत. त्या मोबदल्यात स्वाती कंपनीला मोठ्या प्रमाणावर कमिशन द्यावे लागत आहे. हिच वसुली मनपाच्या कर्मचाऱ्यांनी केली असती तर कोट्यवधी रुपये मनपाचे वाचले असते. मात्र भाजपचे दवाबात हा कंत्राट देण्यात आल्याने अकोला मनपाचे आर्थिक नुकसान झाले आहे. आणि नागरिकांनाही धमक्या मिळत आहेत. त्यामुळे स्वाती कंपनीला दिलेला कंत्राट त्वरीत रद्द करण्यात यावा. यासाठी भविष्यात येत्या ५ डिसेंबर पासुन पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनाच्या वतीने जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. असेही त्यांनी मिश्रा यांनी सांगीतले. 





या पत्रकार परिषदेला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शहर प्रमुख  राजेश मिश्रा, अकोला पुर्व शहर प्रमूख राहुल कराळे, उप जिल्हा प्रमुख गजानन बोराडे मंगेश काळे , उप जिल्हा प्रमुख मंगेश काळे, महीला जिल्हा संघटिका देवश्री ठाकरे, महानगर संघटीका मंजुषा  शेळके, उप जिल्हा संघटिका  सुनीता श्रीवास ,उप शहर प्रमुख गजानन चव्हाण, समन्वयक नितीन ताकवाले उप शहर प्रमुख लक्ष्मण पंजाबी, बंडू सवई, प्रसिध्दी प्रमुख योगेश गिते आदींची उपस्थिती होती.

टिप्पण्या