- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Train-rail-accident-in-Bihar:बिहार मध्ये रेल्वे अपघात: नवी दिल्लीहून कामाख्याला जाणाऱ्या नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेसचा अपघात; जखमींना बाहेर काढण्याचे काम युद्धस्तरावर सुरू
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार 24
नवी दिल्लीहून कामाख्याला जाणाऱ्या नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेसला बुधवारी रात्री साडे नऊ दहाच्या सुमारास बिहारमध्ये अपघात झाला. बक्सर जंक्शनवरून ट्रेन सुटल्यानंतर काही वेळातच रघुनाथपूर पूर्व गुमतीजवळ अपघात झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
प्राप्त माहितीनुसार, रेल्वेच्या सहा बोगी रुळावरून घसरल्या आहेत. रुळावरून घसरल्यानंतर एक बोगी बाजूला पडली आहे. रेल्वे गाडी फार वेगात नव्हती. जखमींबाबत अद्याप कोणतीही निश्चित माहिती नसल्याचं पूर्व मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तर रेल्वेच्या किती बोगी रुळावरून घसरल्या, याची अधिकृत माहिती नाही. जिल्हा प्रशासनाने 60 ते 70 जण जखमी झाल्याचे म्हंटले आहे. मात्र अद्याप याबाबत निश्चित काही सांगता येत नाही. घटनास्थळी मदतकार्यात गुंतलेल्या लोकांनी चार जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितल आहे.
स्थानिक प्रशासनाने या मृत्यूंना दुजोरा दिला आहे. लोक मदतकार्यात गुंतले आहेत. आणखी 35 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
दानापूर विभागातील रघुनाथपूर स्थानकाजवळ बुधवारी रात्री 21.35 च्या सुमारास ट्रेन क्रमांक 12506 नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेसच्या अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली आहे. सामान्य लोक मदतकार्यात गुंतले आहेत. घटनास्थळ शहरी भागापासून दूर आहे. जखमींना बाहेर काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा