- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
political news: बंद द्वार चर्चेमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण; प्रकाश आंबेडकर यांची अमोल मिटकरी यांनी घेतली भेट!
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार 24
अकोला : शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्या ' कॉफी पे चर्चा ' नंतर आता चर्चा रंगली आहे ती म्हणजे अजित पवार गटाच्या विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी आणि प्रकाश आंबेडकर यांच्या ' चाय पे चर्चा ' ची.
सामाजिक विषयांवर चर्चा
अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी आज बुधवारी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकर यांची अकोल्यात आंबेडकरांच्या यशवंत भवन या निवासस्थानी भेट घेतली. सुमारे 40 मिनिट सुरू असलेल्या या बंद द्वार चर्चेत सामाजिक विषयांवर चर्चा झाल्याचं मिटकरींनी सांगितले. आपण धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या आणि दसऱ्याच्या शुभेच्छा देण्यासाठी आंबेडकरांना भेटण्यासाठी आलो असे देखील मिटकरी यांनी स्पष्ट केले. तर शरद पवार आणि आंबेडकरांच्या भेटीचा आणि या भेटीचा कोणताही संबंध नसल्याचंही ते म्हणाले.
TRP साठी काहीही बातम्या लावतात
बंद द्वार असलेल्या या चर्चेमुळे सध्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. ही बैठक राजकीय ? की खाजगी याची चर्चा आता रंगत आहे. मात्र ही चर्चा कोणतीही राजकीय नसल्याचं आंबेडकरांनी म्हंटलं आहे तर चॅनल वाले TRP साठी काहीही बातम्या लावतात असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
राष्ट्रवादी काँगेस
वंचित बहुजन आघाडी
Ajit Pawar
Akola
Amol Mitkari
NCP
Prakash Ambedkar
Sharad pawar
VBA
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा