political maharashtra:महाआरोग्य शिबिरा निम्मित गृहमंत्री अकोल्यात; अन् शिवसेना पदाधिकाऱ्यांना केल्या गेले मंदिरातच नजर कैद!




ठळक मुद्दे


फडणवीस यांनी केलं बच्चू कडू यांचे कौतुक



आपण पालकमंत्री पद सोडलं पालकत्व नाही- देवेंद्र फडणवीस


राज राजेश्वर मंदिराला पर्यटनाचा दर्जा द्यावा


विरोधकांचा आरोग्य यंत्रणेला बदनाम करण्याचं कार्य सुरू


महाआरोग्य शिबीर म्हणजे चाराण्याची कोंबडी आणि बाराण्याचा मसाला- आमदार नितीन देशमुख यांचे वक्तव्य


शिवसेना शिंदे गटाला पूर्णपणे दूर ठेवण्यात आले- जावेद जकारिया यांचा आरोप 








भारतीय अलंकार न्यूज 24 

अकोला: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृह मंत्री देवेंद्र फडणवीस हे अकोल्यात आज महाआरोग्य शिबिरा आणि विविध उद्घाटनासाठी आले होते. दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलिसांनी आधीच दक्षता घेतली होती.  दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी राजेश मिश्रा  शहराचे आराध्य दैवत राजेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेले असता, त्यांना पोलीसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या वाद विवाद नंतर पोलीसांनी मिश्रा आणि त्यांच्या सोबतच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना मंदिरातच नजर कैदेत ठेवले.



काही वेळा नंतर ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख मंदिरात पोहचले. देशमुख यांनी पोलिसांना याबाबत विचारणा केली असता पोलीस आणि आमदार नितीन देशमुख यांच्यात मंदिर प्रवेश द्वाराजवळ वाद निर्माण झाला. राजेश मिश्रा हे उपमुख्यमंत्री यांना शहरातील टॅक्स संदर्भातील समस्याबाबत निवेदन देण्याकरिता जाणार होते. मात्र त्यांना एखाद्या सराईत गुन्हेगारप्रमाणे वागणूक देण्यात आली. ही लोकशाहीची हत्या असल्याचे बोलून याचा निषेध आमदार देशमुख यांनी व्यक्त केला. यानंतर नितीन देशमुख यांनी माजी नगरसेवक राजेश मिश्रा यांच्या छातीत दुखत असल्याचे सांगून त्यांना सर्वोपचार रुग्णालयात नेले.



फडणवीस यांनी केलं बच्चू कडू यांचे कौतुक




देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या वीर सैनिकांना नमन करणे आद्य कर्तव्य असून या अनुषंगाने अकोल्यातील  हुतात्मा स्मारक परिसरात 28 शहिदांना आदरांजली म्हणून त्यांचे पुतळे उभारण्यात आले. नवीन पिढीला त्यांच्या कर्तृत्वाची, त्यागाची कल्पना, प्रेरणा मिळावी म्हणून नाविन्यपूर्ण योजना अंतर्गत पावणे दोन कोटी खर्च करून शहीद मार्गाची उभारणी केली आहेय, या शहीद स्मारकाचे लोकार्पण राज्याचे गृहमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि अकोल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी फडणवीस यांनी बच्चू कडू यांचे कौतुक केले.



आपण पालकमंत्री पद सोडलं पालकत्व नाही- देवेंद्र फडणवीस



उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने रामराज्यची संकल्पना आधीच सोडली असल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. अकोल्यातील महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटनाच्या वेळी ते बोलत होते. तर विजय वडेट्टीवार आमची पार्टी चालवत नसून त्यांनाच डच्चू मिळणार नाही याची काळजी त्यांनी घ्यावी, असा सल्लाही त्यांनी दिला. बच्चू कडू आमचे पार्टनर असून त्यांनी ही मित्रता निभावली पाहिजे. आपण स्वतः बच्चू कडू यांच्याशी चर्चा करणार असल्याचंही फडणवीस म्हणाले. तर आपल्या भाषणातून त्यांनी अकोला येथिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने लवकरच सुरू करणार असल्याची घोषणा केली. या कार्यक्रमात अकोल्याचे नवे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील देखील उपस्थित होते. तर आपण पालकमंत्री पद सोडलं आहे पालकत्व नाही, अस म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी सभेत हसू पिकविला. तर अकोल्याचे आराध्यदैवत राज राजेश्वर मंदिराला पर्यटनाचा दर्जा द्यावा, अशी मागणीही त्यांनी विखे पाटील यांच्याकडे यावेळी केली.



नांदेड सर्वोपचार येथील घटनेच्या संदर्भात बोलतांना फडणवीस यांनी खासगी रुग्णालयांवर ताशेरे ओढले. खाजगी रुग्णालय नाकारलेले रुग्ण सरकारी रुग्णालयात पाठवतात, असा आरोपही त्यांनी केला. तर विरोधकांचा आरोग्य यंत्रणेला बदनाम करण्याचं कार्य सुरू असून त्यांनी ते थांबावे, अशी विनंती देखील फडणवीस यांनी केली.

 


महाआरोग्य शिबीर म्हणजे चाराण्याची कोंबडी आणि बाराण्याचा मसाला- आमदार नितीन देशमुख यांचे वक्तव्य 


अकोल्यातील महाआरोग्य शिबीर म्हणजे चाराण्याची कोंबडी आणि बाराण्याचा मसाला असा आरोप उद्धव ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी केला. महाआरोग्य शिबिर उद्घाटन कार्यक्रम नंतर आमदार देशमुख यांनी पत्रकार परिषद आमंत्रित केली होती. यावेळी पत्रकार परिषदमध्ये ते बोलत होते. 

भाजप प्रशासनाचा वापर करून आपल्या पक्षाचा प्रचार करत असल्याचा आरोप यावेळी देशमुखांनी केला.

प्रशासकीय खर्चातून देवेंद्र फडणवीस प्लेन घेऊन आले, विखे पाटील हेलिकॉप्टर घेऊन आले, भाजप द्वारे महाआरोग्य शिबिराचे जिल्हाभरात बॅनर लावण्यात आले, असा आरोपही  देशमुखांनी केला. रुग्णावर किती खर्च झाला आणि यांच्यावर किती खर्च झाला हे पाहिलं तर 'चाराण्याची कोंबडी आणि बारण्याचा मसाला', अशी परिस्थिती आहे, असे म्हणत महाशिबिर आयोजनाच्या भाजप भूमिकेचा देशमुख यांनी कडाडून विरोध केला.



शिवसेना शिंदे गटाला जाणीव पूर्णपणे दूर ठेवण्यात आले- जावेद जकारिया यांचा आरोप 


आजचे आरोग्य महा शिबिर भाजपच्या एका गटाने पुर्णपणे काबीज केले होते. आरोग्य शिबिराचे आयोजन सरकारने केले होते, पण ज्या पद्धतीने कार्यक्रम आखला गेला, त्यावरून असे दिसते की हा संपूर्ण भाजपचा नियोजित कार्यक्रम होता. ज्यात शिव सेना (शिंदे) गटाला पूर्णपणे दूर ठेवण्यात आले, आरोप शिवसेना (शिंदे गट) चे नेता जावेद जकारिया यांनी केला.


टिप्पण्या