Navratri 2023: गरबा उत्सवात सार्वजनिक शक्ती जागरण समिती राहणार सक्रिय;महिला मुलींच्या सुरक्षिततेसाठी उचलले पाऊल






ॲड. नीलिमा शिंगणे जगड

अकोला : राजराजेश्वर नगरीत इतर सणासुदी सारखाच नवरात्रातील गरबा उत्सवाने मोठी परंपरा निर्माण केली आहे. अनेक वर्षापासून महानगरात ही परंपरा सुरू असून मातृशक्तीचा हा जनजागरण उत्सव नऊ दिवस सातत्याने सुरू असतो. या नऊ दिवसात मातृशक्तीला त्यांचा हा नवचैतन्याचा उत्सव कोणतेही विघ्न उत्पन्न न होता साजरा करता यावा यासाठी नवगठीत सार्वजनिक शक्ती जागरण गरबा रास समिती महिला मुलींचे संरक्षण करण्यासाठी अनेक उपक्रम राबविणार असल्याची माहिती सार्वजनिक शक्ती जागरण रास गरबा समितीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. 



रास गरबा समितीचे अध्यक्ष रामप्रकाश मिश्रा, जेष्ठ उद्योजक नितीन खंडेलवाल, भरत मिश्रा यांच्या उपस्थितीत शुक्रवारी राणी सती धाम येथे आयोजित पत्रकार परिषदेत या समितीची माहिती देण्यात आली. 




महानगरातील सर्व गरबा मंडळांना एकत्रित करून त्यांच्या माध्यमातून भारतीय संस्कृती, सभ्यता व परंपरेचे पालन करून महिलांचा हा सण निर्विघ्नपणे साजरा व्हावा या भावनेने ही समिती सेवाभावी रामप्रसाद मिश्रा यांच्या मार्गदर्शनात गठित करण्यात आली असल्याचे यावेळी सांगण्यात आले. 



समितीत प्रत्येक क्षेत्रातल्या महिलां युवती व नवयुवकाचा समावेश करण्यात आला असून गरबा मंडळांना येणाऱ्या अडचणीचे निराकरण करून प्रशासकीय यंत्रणे सोबत संवाद साधने हा ही उद्देश या समितीचा राहणार आहे. गरबा उत्सवात प्रत्येक गरबा प्रांगणात सीसीटीव्हीची सुरक्षा करणे, मोठ्या संख्येने येणाऱ्या महिला व नवयुवतीच्या सुरक्षिततेसाठी एक उपाय म्हणून समितीच्या वतीने हेल्पलाइन नंबर जारी करण्यात येत असून कोणत्याही संकटात सापडलेल्या महिला मुलीच्या मदतीसाठी समितीचे सेवाधारी दहा मिनिटात उपस्थित होऊन त्यांच्या अडीअडचणीत त्यांना मदत करणार असल्याचे सांगण्यात आले. 


त्याचप्रमाणे प्रत्येक गरबा मंडळ परिसरात विद्युत रोषणाई साठी मनपा प्रशासनाकडे निवेदन करणे, इमर्जन्सी वैद्यकीय व्यवस्था पुरवण्यासाठी अम्बुलन्स सेवा सुरू करणे, अतिरिक्त फायर सिलेंडरची व्यवस्था आदी योजना समितीने हाती घेतल्या असून त्या या नवरात्रात मोठ्या जोमाने सुरू करण्यात येणार आहे. समितीच्या करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. समितीच्या या उपक्रमात मातृशक्तीने सहकार्य करून हा उत्सव मोठ्या जोमाने साजरा करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. 

टिप्पण्या