Navratri-2023-garba-festival: मुंगीलाल बाजोरिया विद्यालय प्रांगणात अवतरणार गुजराती सांस्कृतिक लोकधारा; पारंपारिक गरबा महोत्सवाचे 19 वे वर्ष



ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: श्री गुजराती नवरात्री महोत्सव समितीच्या वतीने महानगरातील मुंगीलाल विद्यालयाच्या प्रांगणात  रविवार 15  ते 22 ऑक्टोबर कालावधीत गरबा  महोत्सव आयोजित करण्यात आला असून महोत्सवाचे हे एकोणवीसावे वर्ष आहे. यावर्षीही सुध्दा या गरबा महोत्सवात नागरिकांसाठी गुजराती सांस्कृतिक लोकधारा गरब्याच्या रूपाने अवतरणार असल्याची माहिती  मुंगीलाल बाजोरिया विद्यालय प्रांगणात शुक्रवारी आयोजित गरबा महोत्सवाच्या पत्रकार परिषदेत समितीचे सचिव हरीश लाखानी यांनी दिली. 



भव्य मंचावर राज्यात पारंपरिक गरबा संगीत व गीत गाणारी अनुभवी अरुण मोदी व श्वेता मोदी यांची संगीत टीम बेंजो व ढोलकीच्या पारंपरिक वाद्यांवर संगीत स्वर उधळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या गरबा  महोत्सवात घट स्थापना, दैनिक चंडीपाठ, दैनिक आरती, पूजन करण्यात येणार असून अष्टमी दिनी प्रांगणात होम हवन करून शुचिर्भूतता निर्माण करण्यात येणार आहे. 



यावेळी पुरुष गरबा प्रेमी साठी गरबा खेळण्याची विशेष व्यवस्था प्रांगणात करण्यात आली आहे . पुरुष आणि महिला यांनी भारतीय पारंपरिक पेहरावतच प्रांगणात गरबा खेळून भारतीय संस्कृती व सभ्यता जपावी तसेच युवावर्गानेही मातृशक्तीच्या या जागरण महोत्सवात कोणताही अनुचित प्रकार होणार नाही याची दक्षता घेत समितीला सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. गरबा महोत्सवात मातृशक्तीची सुरक्षितता व आसन व्यवस्था संदर्भात समितीने चोख  व्यवस्था निर्माण केली असून पुरुष वर्गासाठी स्वतंत्र बसण्याची व्यवस्था राहणार आहे.तसेच प्रवेश हा पासेस द्वारेच देण्यात येणार आहे.प्रांगणात सीसीटीवी व महिला गार्डची व्यवस्था राहणार आहे. उत्तम विद्युत व ध्वनी व्यवस्था हे या महोत्सवाचे खास आकर्षण राहणार आहे. महोत्सव चांगल्या पद्धतीने व्हावा यासाठी प्रशासनाच्या सूचना व निर्देशांचे वेळोवेळी पालन करण्यात येणार आहे. गरब्यात यावर्षीही भरपूर व आकर्षक पुरस्कार देण्यात येणार आहेत.तसेच उत्तम गरबा  खेळणाऱ्या महिला-मुलीस पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.   घट स्थापना दिनी सायंकाळी  मुंगीलाल बाजोरिया विद्यालय प्रांगणात मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित या गरबा  महोत्सवाच्या उदघाटन सोहळ्यास व नित्य गरबा  बघण्यास नागरिक महिला-पुरुषांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.



समितीचे अध्यक्ष वालजी पटेल, हेमेन्द्र राजगुरू, मनोज भीमजियानी, दिनूभाई सोनी, आशीष वखारीया,अरविंद पटेल, कपिल ठक्कर, प्रकाश लोढिया, शीतल रुपारेल,अनिषा वखारिया,नीलिमा वोरा आदी पदाधिकारी उपस्थित होते.




 

टिप्पण्या