leopard attacks: बिबट्याचा दोघांवर हल्ला; अकोला शहरात पसरली दहशत



ठळक मुद्दे

*न्यू हिंगणा परिसरात आढळला बिबट 

*शहरात पसरली बिबट्याची दहशत 

*दोघांवर केला बिबट्याने हल्ला

* सीसीटीव्हीत थरार कैद




भारतीय अलंकार 24

अकोला: शहरातील न्यू हिंगणा फाटा परिसर जयराम वाईन बार जवळील आहुजा गोडाऊन येथे शुक्रवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास बिबट्या  आढळल्याने अकोला शहरात एकच खळबळ उडाली. या बिबट्याने दोन व्यक्तींवर हल्ला चढविल्याने शहरात दहशत पसरली आहे. 



एका गोदाम जवळ मजूर काम करत असताना हा बिबट्या तिथे आला. दोन मजुरावर झडप मारून जखमी केले. या हल्ल्यात दोन मजुर जखमी झाले आहेत दोघांनाही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भरती करण्यात आले . यातील एक मजूर गंभीर तर दुसरा किरकोळ जख्मी झाला आहे. भोला जाधव आणि राकेश अशी या दोघांची नावे असल्याचे समजते.




हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. या बिबट्याला पकडण्याकरता वनविभाग कर्मचारी  प्रयत्न करीत आहेत .जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये ही घटना घडली. जुने शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन लेव्हळकर यांना घटनेची माहिती मिळताच ते आपल्या चमुसह  घटनास्थळी दाखल झाले होते. 

या घटनेमुळे परिसरातील रहिवासी भयभीत झाले असून, वनविभागाने बिबट्याला लवकर पकडावे, अशी मागणी न्यू हिंगणा येथील माजी सरपंच पुरुषोत्तम अहिर यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना केली.

टिप्पण्या