jan-samvad-yatra-bjp-akola: शरद पवार 100 मीटर चालून गेले असते तर गोवारी हत्याकांड घडलं नसतं- चंद्रशेखर बावनकुळे









ठळक मुद्दे 

*बावनकुळे यांच्या सभेत ते दोन सराईत गुन्हेगार कोण?

*बावनकुळे यांच्या ताफ्याला काळे-भगवे झेंडे दाखवून निषेध

*ज्यांचे पायलट संजय राऊत आहे ते विमान कोसळणार-चंद्रशेखर बावनकुळे

*ग्रामदैवत श्रीराजराजेश्वरला जलाभिषेक



ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: शरद पवार 100 मीटर चालून गेले असते तर नागपूर येथील गोवारी हत्याकांड घडलं नसतं, असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे.

अकोल्यात रविवारी जनसंवाद यात्रे दरम्यान ते माध्यमांशी बोलत होते. सत्ता असताना शरद पवार कधी मराठा आरक्षणासाठी आग्रही राहिले नाही असंही ते म्हणाले. नागपूर मधील गोवारी समाजच हत्याकांड झाल्यावरही पवार भेटायला गेले नाही, त्यामुळे शरद पवारांना गृहमंत्र्यांचा राजीनामा मागणारे हे कोण असा टोलाही बावनकुळे यांनी शरद पवारांना लागवला. तर जालन्यात घडलेल्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी मागणी बावनकुळे यांनी केली. मराठा समाजाला आरक्षण मिळालाच पाहिजे असं मत ही यावेळी बावनकुळे यांनी व्यक्त केलं.



ज्यांचे पायलट संजय राऊत आहे ते विमान कोसळणार-चंद्रशेखर बावनकुळे


भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वातील जनसंवाद महविजय 2024 यात्रा रविवारी अकोल्यात पोहचली. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. माध्यमांशी बोलतांना बावनकुळे यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. मराठा आरक्षण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांना गेलं असल्याचं बावनकुळे म्हणाले तर 40 वर्ष शरद पवार मराठा आरक्षण संदर्भात बोलले नाही आणि आता का बोलत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शरद पवार यापुढे कधीही सत्तेत येणार नाही, असा टोला ही त्यांनी लगावला. ज्यांचे पायलट संजय राऊत आहे ते विमान कोसळणार असून त्यांच्या विमानात कोणी बसायला तयार नाही, असा टोलाही त्यांनी लावला. काँग्रेसने सुरू केलेल्या संवाद यात्रेला जन समर्थन मिळणार नाही, असे  देखील बावनकुळे स्पष्ट म्हणाले. तर दंगल सारख्या विषयावर भाष्य न करण्याची विनंती बावनकुळे यांनी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांना केली.



ते दोन सराईत गुन्हेगार कोण?


अकोल्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली संवाद यात्रा रविवारी झाली. अकोल्यातील तुषार हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांना प्रवेश देण्यासाठी पासची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र अस असतांना कुठलीही पास नसताना या बैठकीत दोन सराईत गुन्हेगारांनी  सभेत प्रवेश मिळविला. विशेष म्हणजे, एकीकडे या बैठकस्थळी मोठा बंदोबस्त असतांना याठिकाणी दोन सराईत गुन्हेगार आले कसे, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. बैठक सुरू झाल्यानंतर या दोघांना पोलिसांनी आतमधून पकडून त्यांना पोलिस ठाण्यात नेले.  कोणत्या उद्देशाने हे दोन्ही गुन्हेगार सभेत आले होते, याचा तपास पोलीस करत आहेत.






ग्रामदैवत श्रीराजराजेश्वरला जलाभिषेक 


संवाद यात्रा निमित्त राजराजेश्वर नगरीमध्ये आगमन प्रसंगी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अकोल्याचे ग्रामदैवत राजराजेश्वर भगवानचे दर्शन घेवून, राज्यात भरपूर पाऊस येऊन शेतकरी व सर्वसामान्य नागरिक सुखी संपन्न व्हावा,असे साकडे घातले.

तसेच 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली व राज्यात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकार यावे व महाराष्ट्र प्रथम क्रमांकचे राज्य व्हावे, अशी प्रार्थना केली.


संवाद यात्रेच्या माध्यमातून संस्कृती आणि राज्यातील मानबिंदू असलेल्या देवस्थानांना भेटी देऊन ऐतिहासिक वारसांना जपणाऱ्या संस्था चालकांना तसेच धर्मप्रेमी नागरिकांची भेट घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असलेले सरकारच्या 'घरघर चलो' अभियानांतर्गत भाविकांची भेट घ्यावी, या दृष्टीने भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी ग्रामदैवत राजेश्वर मंदिरात जाऊन विशेष पुजा अर्चना आणि जलाभिषेक केला. 


अकोल्यातील राजराजेश्वर मंदिराचे महत्त्व, अकोला शहरातील कावड यात्रा पालखी सोहळा हा अद्भुत पूर्व, भक्ती, श्रद्धा व संस्काराला प्रेरणा देणारी, हिंदू एकतेला बळ देणारी असल्याचा सांगून सर्व शिवभक्तांचे व राजराजेश्वर नगरी सोबत जिल्ह्यात निघणाऱ्या कावड यात्रे संदर्भात सर्व भक्तांना नमन केले. 

 



काळे-भगवे झेंडे दाखवून मराठा समाजाने केला निषेध


जालन्यातील प्रकारानंतर आता मराठा समाज चांगलाच संतप्त झाला आहे. अकोल्यातील भाजपच्या जनसंवाद यात्रा करिता रविवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे अकोल्यात आगमन झाले होते. बावनकुळे यांच्या अकोला दौऱ्या दरम्यान सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी बाळापूर तालुक्यातील पारस फाट्याच्या रस्त्यावर बावनकुळे यांच्या ताफ्याला काळे-भगवे झेंडे दाखवून निषेध केला. यावेळी निषेध करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेवून नंतर सुटका केली.







टिप्पण्या