- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार 24
अकोला:अकोला महानगर पालिका आयुक्त तथा प्रशासक कविता व्दिवेदी यांच्या आदेशान्वये आणि प्र.सहाय्यक संचालक नगर रचना आशिष वानखडे यांच्या मार्गदर्शनात व उपस्थितीत शुक्रवार 1 सप्टेंबर रोजी सकाळी अकोला महानगर पालिका क्षेत्रातील उत्तर झोन स्थित स्थानिक सिटी कोतवाली चौक येथील नाल्यावर केलेले पक्क्या स्वरूपाचे अतिक्रमीत बांधकामावर पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने मनपा अतिक्रमण विभाग आणि झोन कार्यालय मार्फत निष्कासनाची कारवाई करण्यात आली आहे.
यावेळी त्या परिसरातील रसवंतीचे आणि ईतर अतिक्रमण सोबत अनाधिकृत लावण्यात आलेले जाहीराती होर्डींगवर सुध्दा निष्कासनाची कारवाई करण्यात आली आहे.
यावेळी उत्तर झोनचे प्र.सहा.आयुक्त विठ्ठल देवकते, सिटी कोतवालीचे ठाणेदार सुनिल वायदांडे, पोलीस उपनिरीक्षक पठाण, सहा.पोलीस निरीक्षक विजय झटाले, ऐजाज शेख, सहा.नगररचनाकार राजेंद्र टापरे, सहा.अतिक्रमण अधिकारी प्रवीण मिश्रा, चंद्रशेखर इंगळे उत्तर झोनचे अभियंता अक्षय बोर्डे याचसोबत सिटी कोतवालीचे हेड कॉन्स्टेबल हाडोळे, रुपेश इंगळे, धीरेंद्र पवार, मुस्तफा खान, सै.रफिक, स्वप्निल शिंदखेडकर, वैभव कवाडे, मनीष भोम्बले, सलीम, सोनू गायकवाड, पवार, जीवन मानकीकर, पवन चव्हाण, जय गेडाम, योगेश कांचंपुरे, मनपा अतिक्रमण विभागाचे आणि महिला व पुरूष पोलीस कर्मचारी तसेच अभिकर्ताचे कर्मचा-यांची उपस्थिती होती.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा