Srimad Bhagwat Katha: श्री खाटूश्याम बाबा मंदीर येथे मंगल कलश यात्रेने प्रारंभ झाली श्रीमद भागवत कथा




भारतीय अलंकार 24

अकोला: चित्रकूट धाम येथील नितिनदेव महाराज यांच्या ओजस्वी वाणीतून श्रीमद भागवत कथा समस्त मिश्रा परिवार अकोला यांच्या वतीने आयोजित श्री खाटूश्याम बाबा मंदीर अकोला येथे काल 10 ऑगस्ट रोजी 51 मंगल कलशाने शेकडो भाविक महिलांच्या उपस्थितीत आयोजक नगरसेवक राजेश मिश्रा व अनिता मिश्रा यांनी भगवान सुखदेवांची आराधना केली, आणि कथा प्रारंभ झाली.

दुपारी 2 वाजेपासून 6 वाजेपर्यत 10ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत चित्रकूट धाम येथिल श्रीनितिनदेवजी महाराज यांच्या ओजस्वी वाणीतून श्रीमद भागवत कथा राजेश मिश्रा व परिवाराच्या वतीने आयोजित केली आहे. दररोज आयोजक व भाविक भक्तांच्या वतीने विवीध धार्मिक जिवंत देखावे सादर करण्यात येत आहेत. 


कथेच्या पहिल्या दिवशी भगवान श्रीकृष्णाची झांकी सादर करण्यात आली होती. तर आज शुक्रवारी श्री महाराज नितीनजींच्या मधुर वाणीतून भक्ति, श्रद्धा आणि भागवत कथेचे महत्व विषद करताना तुंगभद्रा नदीच्या काठी वसलेले अनुपम नगर येथील धुंधलिवला आत्मदेव महाराज यांच्यासोबत घडलेला दृष्टांत सांगताना कथावाच्क नितिन महाराज यांनी देव भेटण्यापुर्वी  संताची भेट होते त्यांनतर भाविकांना देव दर्शन होते, असे सप्रमाण संगितले. 




या धार्मिक कथेसोबतच वृक्ष किती महत्वाचे आहेत, याचे फायदे विषद करून प्रत्येकाने आपापल्या वाढदिवसानिमित्त आणि लग्नाच्या वाढ दिवशी वृक्षारोपन करण्याचे आवाहन केले. 



आज दुसऱ्या दिवशी भगवान सुखदेव यांची झांकी सादर करून सर्व भाविक मंत्रमुग्ध झाले. स्व कृपाशंकर मिश्रा यांच्या स्मरणार्थ स्थानिक खाटू श्याम मंदिर, अकोला येथे 10 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट दरम्यान श्रीमद भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. शेकडो भाविक महिलांच्या उपस्थितीत कलश यात्रा मोठ्या थाटामाटात बँड वादनाने काढण्यात आली. ज्यामध्ये कथावाचक चित्रकूटधाम निवासी श्री नितीनजी महाराज यांच्या  ओजस्वी वाणीतून  श्रीमद भागवत कथा सांगितली जाते आहे . भागवत कथेची वेळ दुपारी 2 ते 6 अशी ठेवण्यात आली आहे.




या कथेला जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्रीमद भागवत कथा आयोजक यांच्या वतीने करण्यात आले आहे.  ही भागवत कथा यशस्वी करण्यासाठी अरुण शर्मा, नितिन मिश्रा, सूरज भिंडा, दिनेश श्रीवास, दिपक अग्रवाल, अनिल भुटियानी गोपाल लव्हाले, गणेश बुंदेले, पिंटू मिश्रा हे आपली सेवा देत आहेत .



टिप्पण्या