srimad-bhagwat-Katha-Akola: रत्नमालाला दिलेला वर श्रीकृष्ण अवतारात केला पूर्ण- नितीनदेव महाराज


 



ठळक मुद्दे 

पुतणा मावशीचा अवताराचा  जन्म घेताच केला उद्धार


श्री खाटूश्याम बाबा मंदीर श्रीमद भागवत कथेचे पुष्प पाचवे 


आज ५६ भोग प्रसाद केला अर्पण


भारतीय अलंकार 24

अकोला: भगवान नारायण यांच्या विविध अवतारांमध्ये श्रीकृष्ण अवतार मध्ये जन्म घेताच पूर्व जन्मातील राजा बळीची मुलगी रत्नमाला हिला दिलेल्या वराची पूर्तता करण्यासाठी कृष्णाला मारण्यासाठी आलेल्या या जन्मातील पुतना मावशीचे स्तनपान करून  पहिल्यांदा विष, नंतर दुध आणि शेवटी तिचे प्राण पिऊन पुतना मावशीचा उद्धार केला. देवाची इच्छा झाली की, देव भक्तांचा उद्धार करतो तसेच पापीचा सुध्दा उद्धार होतो. याबाबत दृष्टांत दिला. चित्रकूट धाम येथिल नितिनदेव महाराज यांच्या ओजस्वी वाणीतून सुरू असलेल्या श्रीमद् भागवत कथेत पाचवे पुष्प गुंफताना संगितले. 



श्रीकृष्ण अवतार मध्ये जन्म घेताच पुतना मावशीचा उद्धार करण्यापूर्वी ब्रम्हांड मध्ये कोणती जागा रीक्त आहे, याची माहिती घेण्यासाठी पहिल्यांदा डोळे मिटले आणि भगवान शंकराला विष पिण्यासाठी पुकारले भगवान शंकर बनुन विष पिले. श्रीकृष्णाने दूध पिले आणि तिचे प्राण पिऊन तिचा उद्धार केला, अशी कथा सांगितली 



पुरुषोततम मास  निमित्ताने स्व कृपाशंकर मिश्रा यांच्या स्मरणार्थ स्थानिक खाटू श्याम मंदिर, अकोला येथे 10 ते 16 ऑगस्ट दरम्यान श्रीमद भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. चित्रकूट धाम येथिल नितिनदेव महाराज यांच्या ओजस्वी वाणीतून  राजेश मिश्रा परिवार अकोला यांच्या  वतीने  आयोजित श्री खाटूश्याम बाबा मंदीर अकोला येथे आज सोमवारी भागवत कथेचे पाचवे पुष्प गुंफताना नितिनदेव महाराज यांनी आज सोमवारी श्रीकृष्ण लीला, माखनचोर  लीला विस्तार पूर्वक सांगितल्या.





भागवत कथेत दररोज आयोजक व भाविक भक्तांच्या वतीने विवीध धार्मिक  जिवंत देखावे सादर करण्यात येत आहेत.  कथेच्या पहिल्या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा देखावा नंतर  शंकर पार्वती यांचा देखावा,  हिरण्या कश्यप, भगवान नृसिंह आणि भक्त प्रल्हाद  वामन, वासुदेव, यशोदा आणि श्रीकृष्ण जन्मोत्सव  आणि आज सोमवारी माखन चोरी आणि गोवर्धन पर्वतचा  जिवंत देखावा उभा करण्यात आला होता.   





आजच्या कथे दरम्यान ५६ भोग प्रसाद अर्पण करण्यात आला.  भागवत कथेची वेळ दुपारी 2 ते 6 अशी ठेवण्यात आली आहे. या कथेला जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्रीमद भागवत कथा आयोजक मिश्रा परीवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.  






ही भागवत कथा यशस्वी करण्यासाठी अरुण शर्मा, नितिन मिश्रा, सूरज भिंडा, दिनेश श्रीवास, दिपक अग्रवाल, अनिल भुटियानी गोपाल लव्हाले, गणेश बुंदेले, पिंटू मिश्रा हे आपली सेवा देत आहेत तर मंच संचलन महेन्द्र जोशी करत आहेत.

टिप्पण्या