mns-agitation-is-successful: अखेर मनसेच्या आंदोलनाला यश; अकोला-अकोट रेल्वे प्रवास द्रुतगतीने सुरू…


प्रवासी व्यापारी व विद्यार्थी यांना मनसेच्या वतीने पेढे वाटप करून आनंद साजरा केला.




भारतीय अलंकार 24

अकोला: अकोट रेल्वे प्रवास द्रुतगतीने सुरू व्हावा, याकरिता मनसे जनहित कक्ष व विधी विभागाचे राज्य सरचिटणीस ॲड. नंदकिशोर शेळके यांनी अकोट येथील प्रवासी विद्यार्थी व व्यापारी वर्ग तसेच कर्मचारी वर्ग यांच्या विनंतीवरून दक्षिण मध्य रेल्वेचे रेल्वे प्रबंधक नांदेड यांना निवेदन दिले होते. त्यामध्ये अकोला अकोट रेल्वे मार्गाचा वेग वाढवा अन्यथा आंदोलन करण्यात येईल, अशा प्रकारची चेतावणी दिली होती. यासंदर्भातील निवेदन रेल्वे स्टेशन मास्तर प्लॅटफॉर्म नंबर 6 यांना देण्यात आले होते. त्यावेळेस शेकडो रेल्वे प्रवासी उपस्थित होते. कारण गांधीग्राम येथील नदीवरील पूल खचल्यामुळे व अकोला-अकोट रस्ता बंद झाल्यामुळे अकोट विभागातील व शहरातील सामान्य नागरिकांना अकोला येथे येण्याकरिता रेल्वे शिवाय दुसरा पर्याय नव्हता. त्यामुळे सर्व रेल्वे प्रवासी वर्गांनी त्रासाला कंटाळून मनसेचे राज्य सरचिटणीस ॲड. नंदकिशोर शेळके यांना निवेदन दिले. त्यावरून ॲड. शेळके यांनी निवेदन दिले व आंदोलनाचा इशारा दिल्यामुळे दक्षिण मध्य रेल्वेचे अधिकारी यांनी तात्काळ रेल्वे मार्गाची दुरुस्ती करून आजपासून रेल्वेचा वेग वाढविण्यात आला. 


हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दिलेल्या निवेदन व आंदोलनाचे यश आहे, ऍड.नंदकिशोर शेळके यांनी सांगितले.

टिप्पण्या