court news: सुरक्षा कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घालणाऱ्या आरोपीचा नियमीत जामीन अर्ज मंजुर




भारतीय अलंकार 24

अकोला: रेल्वे पोलीस स्टेशन अकोला येथे  २९/०६/२०२३ रोजी फिर्यादी इरफान खान अजीज खान पठाण रेल्वे पोलीस शिपाई याने तक्रार दाखल केली होती की, वर नमुद तारखेला फिर्यादी हा प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक अर्चना गाडगे यांच्या सोबत रेल्वे स्टेशनच्या प्लॉट फार्म क्रमांक. १ वर गस्त करीत असतांना, अमरावती मुंबई एक्सप्रेस गाडी नं. १२११२ आली असतांना, अपंग व्यक्तीच्या कोचजवळ आरोपी पंजय शिवलाल राठोड, पोलीस शिपाई वरळी पोलीस मुख्यालय हा एस्कॉट ड्युटी करीत असलेले सुरक्षा कर्मचारी यांच्यासोबत हुज्जत घालत असतांना दिसला. त्यावेळेस त्यांनी इतर कर्मचा-यांसोबत वादविवाद केले.  पोलीस अधिका-यांना शिवीगाळ करुन अंगावर धावून आला व मॅडमवर हात उचलले. अश्या तक्रारीवरुन आरोपी पंजय शिवलाल राठोड याच्या विरुध्द भा. द.वी च्या कलम ३५३, ३३२, ५०४, ५०६ व महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम ८७ प्रमाणे गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली होती. 



आरोपी तर्फे ॲड. पप्पु मोरवाल यांनी कोर्टात नियमीत जामीन अर्ज दाखल करुन युक्तीवाद केला की, आरोपी याला खोटे प्रकरण्यात गोविण्यात आले आहे. आरोपी हा शासकीय सेवेत असल्यामुळे फरार होण्याचा प्रश्नच येत नाही. ॲड. पप्पु मोरवाल यांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन विद्यमान जिल्हा व सत्र न्यायालय अकोला यांनी अटी व शर्तीवर आरोपीचे नियमीत जामीन अर्ज मंजुर केले. त्यावेळेस त्यांना ॲड. प्रविण तायडे, ॲड. अक्षय दामोदर व विधी विधार्थी गणेश खेडकर, सौरभ डाहाके, कश्यप अहिर, प्रमेय भोसले, राधेश्याम अवारे, सृष्टी ठाकरे, मिताली लखवानी, रुषीकेश संजय, रुतीक मलीये, सुनिल सरदार, अमीत लोढम इत्यादीने सहकार्य केले.

टिप्पण्या