Court news: नाव बदलवून महिलेवर अत्याचार; अरोपीचा जमानत अर्ज न्यायालयाने फेटाळला





भारतीय अलंकार 24

अकोट: येथील जिल्हा व सत्र न्यायाधिश  चकोर बावीसकर यांनी अकोट शहर पोलीस स्टेशनचे फाईलवरील अप.क्र. 332 / 2023 भा. द. वि. कलम 376 (2) (एन) 386, 506 सह कलम 66 (ई) माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 मधील आरोपी से शरीफ सै. शफी उर्फ धारण केलेले नाव प्रेम पाटील वय 29 वर्ष, रा. कुन्हा काकोडा, ता. मुक्ताईनगर, जि. जळगांव. ह.मु. अकोट याचा जमानत अर्ज नामंजुर केला आहे. 



या प्रकरणात अकोट येथील पिडीत मुलीने अकोट शहर पो.स्टे. ला फिर्याद दिली की, या आरोपी से शरीफ से शफी ने पिडीत मुली सोबत फेसबुकवर ओळख करुन या आरोपीने त्याचे नाव प्रेम पाटील असल्या बाबत सांगीतले होते व त्यानंतर या पिडीत मुलीचे फेसबुक अकॉउंट हॅक करून पिडीत मुलीचे नातेवाईकांसोबत संपर्क करून पिडीत मुलीला शारिरीक संबंध ठेवण्यासाठी ब्लकमेलींग करून वारंवार शारिरीक संबंध ठेवले व या बाबतचे व्हिडीओ बनवुन पिडीत मुलीला धमकी दिली तु जर माझ्या सोबत शारिरीक संबंध ठेवले नाही तर शोशल मिडीयावर सदर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देवुन आरोपीने पिडीत फिर्यादी महिलेकडून वेळोवेळी थोडेथोडे करुन असे एकुण 3,70,000/- रु. ची खंडणी वसुल केली. तसेच तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी देवुन आरोपीने वारंवार फिर्यादी महिलेसोबत जबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले, या रिपोर्टवरुन अकोट शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार तपण कोल्हे यांनी गुन्हा दाखल करून सविस्तर व बारकाईने तपास केला. अकोटचे उप विभागीय पो. अधिकारी आय.पी.एस. रितु खोकर यांचे मार्गदर्शनात तपास सुरु केला आहे. त्यामुळे वरील प्रकरणात पुढे काय निश्पन्न होते समोर येण्याची शक्यता आहे. या प्रकरणात पंचा समक्ष

आरोपी याचा मोबाईल जप्त करण्यात येवुन सि.ए. तपासणी कामी रवाना करण्यात आला आहे. या प्रकरणात आरोपी सै. शरीफ यांला पोलीसांनी 7 जुन 2023 रोजी अटक करून त्याची पोलीस कोठडी घेवून त्यानंतर त्याला अकोला कारागृहात बंदीस्त केलेले आहे.


या प्रकरणात सरकार तर्फे सरकारी वकील अजीत देशमुख यांनी न्यायालयात युक्तीवाद केला की, आरोपी सैय्यदने केलेला गुन्हा हा अतिशय गंभीर स्वरुपाचा आहे. याने  पिडीत महिलेला फेसबुकद्वारे स्वतःची ओळख प्रेम पाटील दर्शवुन तीला जाळ्यात ओढले. व त्यानंतर पिढीत महिले सोबत जबरीने संबंध करुन शारिरीक संबंधाचे व्हिडीओ व्हायरल करण्याची व जिवे मारण्याची धमकी देवुन पिढीते कडून 3,70,000/- रु. ची खंडणी वसुल केली. या प्रकरणात आरोपीला जमानत मंजुर झाल्यास पिडीत मुलीला आरोपी पुन्हा मानसीक त्रास देवुन तिचे सोबत जबरदस्तीने शारिरीक संबंध प्रस्तापीत करण्याची शक्यता नाकारता येत नाही. आरोपी सैय्यदच्या कृत्यामुळे पिडीत मुलगी मानसीक दडपना खाली आहे. आरोपीची जमानत झाल्यास पिडीता व तीचे कुटूंबीयांचे जिवीतास धोका निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. आरोपी हा अकोट येथेच भाडयाच्या घरात राहत असुन आरोपीला जर जमानत दिली तर यातील पिडीता, साक्षीदार, पंच यांच्यावर दबाव आणण्याची शक्यता आहे तसेच आरोपी पिडीतीयाच्या कुटूंबीयांसोबत या गुन्ह्याच्या कारणावरुन वाद करुन पुन्हा एखादा गंभीर गुन्हा घडण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील आरोपी सै. शरीफ सै. शफी हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असुन त्याच्यावर या पूर्वी पो.स्टे. मलकापूर, जि. बुलढाणा येथे अप.क्र. 74/2012 कलम भादवि 324, 504, पो.स्टे. नांदूरा, जि. बुलढाणा येथे अप.क्र.3008 / 2014 कलम 12 (अ) मजुका तसेच पो.स्टे. मलकापूर, जि. बुलढाणा येथे अप.क्र.660/2021 कलम 4, 25, आर्म ॲक्ट अन्वये गुन्हे नोंद आहेत. त्यामुळे कोर्टाने आरोपी सै. शरीफ  याचा जमानत अर्ज

नामंजुर करावा अशी विनंती सरकार तर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांनी कोर्टाला केली.  कोर्टाने दोन्ही पक्षाच्या युक्तीवादानंतर या आरोपीचा जमानत अर्ज नामंजुर केला.  कोर्टाने जिल्हा व सत्र न्यायाधिश चकोर बावीसकर यांनी आदेशामध्ये नमुद केले की, शरीर संबधाची अश्लील चित्रफीत बनवीणे, त्यास समाज माध्यममांवर प्रसारीत करण्याची धमकी देणे तशी धमकी देवुन पिडीतेचे शोषण करणे या सर्व बाबी अत्यंत गंभीर आहेत या सर्व प्रकारावरून आरोपीची कृर मानसीकता स्पष्ट होते आरोपाविरुध्द इतर पो.स्टे.ला देखील गंभीर गुन्हाची नोंद आहे. या प्रकरणातील गुन्ह्यास देखील विवक्षीत परिस्थितीत जन्मठेपे पावतोची शिक्षा आहे. आरोपीचा गुन्हयांचा पूर्व इतिहास आहे. आरोपीने अगदी पूर्व नियोजित पद्धतीने ठरवुन, विवाहीतेस जाळ्यात ओढून आधी प्रेमाने व नंतर जबरदस्तीने तिचे लैंगीक, आर्थिक, भावनीक शोषण केले आहे या सर्वांचे गंभीर परिणाम पिडीतेच्या मानसीकतेवर, भावनीकतेवर, कौटुंबीक नातेसंबंधावर तिच्या सामाजिक स्थानावर मोठया प्रमाणात होणार आहे. गुन्हे मागील तीन वर्षापासुन नजीकच्या भुतकाळात अगदी आता पावेतो घडलेले आहेत मुळात या प्रदिर्घ गुन्हयाची फीर्याद नोंदविण्याचे धाडस पिडीतेला  7/06/2023 रोजी केवळ दोनच महिन्यापुर्वी झाले आहे. गुन्हयाचा तपास सुरु आहे तेव्हा या प्राथमिक अवस्थेवर आरोपीला जामीन दिल्यास त्याचा खचीतच दुष्परिणाम पिडीतेवर तिच्या मानसीकतेवर, सुरक्षीततेवर आणि एकुणच भवितव्यावर होण्याची अगदी दाट शक्यता आहे. त्यामुळे तुर्त हा जमानत अर्ज मंजुर होण्याजोगा नाही. म्हणून सर्व तथ्यात्मक परिस्थीतीच्या पार्श्वभुमीवर हा अर्ज फेटाळला जाण्यास पात्र आहे व फेटाळण्यात येत आहे. असे देखील वि. कोर्टाने आदेशामध्ये नमुद करुन आरोपीचा या प्रकरणातील जमानत अर्ज नामंजुर केला.

टिप्पण्या