Asian Champions Trophy 2023: भारतीय हॉकी संघ अजिंक्य;चौथ्यांदा जिंकले विजेतेपद

हॉकी इंडिया 



ठळक मुद्दा 
भारताच्या विजयात जुगराज सिंग (९'), हरमनप्रीत सिंग (४५'), गुरजंत सिंग (४५') आणि आकाशदीप सिंग (५६') यांनी गोल केले.



भारतीय अलंकार 24

स्पोर्ट डेस्क 

एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 स्पर्धेचा अंतिम सामना शनिवारी भारत विरुद्ध मलेशिया हॉकी संघात चेन्नई येथे झाला. सामन्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत रोमहर्षक झालेल्या या सामन्यात भारतीय संघ शानदार प्रदर्शन करीत अजिंक्य ठरला. या विजया बरोबरच भारतीय संघाने स्पर्धेचे चौथ्यांदा विजेतेपद जिंकले. 

हॉकी इंडिया 


भारताने अंतिम सामन्यात मलेशिया विरुद्ध 4-3 गोलफरकाने विजय मिळवला आहे. याआधी भारताने 2011, 2016 आणि 2018 या तीन वर्षी एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे, हे येथे उल्लेखनीय आहे.


हॉकी इंडिया 


चुरशीचा झालेल्या अंतिम सामन्यात हाफ टाईमपर्यंत मलेशिया संघ 3-1 अशी आघाडीवर होता. मात्र तिसऱ्या क्वार्टर्सच्या शेवटच्या मिनिटाला भारताकडून हरमप्रीत सिंग आणि गुरजंत सिंग यांनी गोल करत भारताला बरोबरी साधून दिली. त्यानंतर अखेरचे 4 मिनिटे बाकी असताना भारताकडून आणखी एक गोल आकाशदीप सिंगने नोंदवला. तत्पूर्वी भारताकडून पहिला गोल जुगराज सिंगने केला होता. भारताने केलेल्या या अप्रतिम खेळ प्रदर्शनामुळे करोडो भारतीयांचा उर अभिमानाने भरून आला.

हॉकी इंडिया 

अंतिम सामन्यापूर्वी जपान आणि कोरिया हॉकी संघात तिसऱ्या आणि चौथ्या स्थानासाठी सामना रंगला.  जपानने या सामन्यात 5-3 अशा फरकाने कोरियाला नमवत स्पर्धेत तिसरेस्थान पटकाविले.

हॉकी इंडिया 


भारत: कृष्ण बहादुर पाठक, वरुण कुमार, जरमनप्रीत सिंह, मनप्रीत सिंह, हार्दिक सिंह, गुरजंत सिंह, मनदीप सिंह, हरमनप्रीत सिंह, सुमित, शमशेर सिंह, आकाशदीप सिंह.




टिप्पण्या