- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
antiquities-found-pola-chowk: पोळा चौक परिसरात खोदकामात आढळल्या पुरातन वस्तू! शहरात खळबळ; नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये - जिल्हा व पोलीस प्रशासनाचे आवाहन
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार 24
ॲड. नीलिमा शिंगणे जगड
अकोला: जुने शहरातील किल्ला चौक ते पोळा चौक दरम्यानच्या रस्त्याचे काम सुरू आहे. आज शनिवारी सायंकाळी नाल्याचे खोदकाम सुरू असताना पुरातन काळातील काही वस्तू याठिकाणी सापडल्याने एकच खळबळ उडाली. मात्र येथे आढलेल्या यावस्तू पुरातन नसून काही वर्ष जुने असलेले बांधकाम साहित्य असल्याचे निदर्शनात आले. यामुळे नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन अकोला जिल्हा व पोलीस प्रशासनाने केले आहे.
पुरातन साहित्य आढळल्याची वार्ता संपूर्ण शहरात आगीसारखी पसरली होती. जुने शहर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून खोदकामाच्या जागेला घेराव घातला. या वस्तू बघण्यास नागरिकांनी परिसरात गर्दी केली. प्राप्त माहितीनुसार येथे आढळलेल्या वस्तू या प्राचीन काळातील असतील,असा प्राथमिक अंदाज बघेकर्यानी लावला होता. या वस्तूंचा कालखंड अथवा इतर माहिती नाही. या वस्तू किती जुन्या आहेत. यासाठी पुरातन विभागाला पाचारण करण्यात आले आहे. उद्या सकाळ पर्यंत पुरातन विभाग टीम येवून पाहाणी करणारं असल्याची महिती आहे.
दरम्यान या प्राचीन वस्तू असल्याचे काही नागरिकांचे म्हणणे असल्याने रस्ता काम सध्या थांबवण्यात आले आहे. जुने शहर पो. स्टे. ठाणेदार नितीन लेवरकर यांनी येथे चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. दरम्यान जिल्हाधिकारी अजितकुमार कुंभार यांनी घटनस्थळाला भेट दिली. याठिकाणी आढळलेल्या वस्तू या पुरातन काळातील नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र याठिकाणी आढलेले साहित्य काही वर्षां पूर्वीचे जुने कुदळ, फावडे, टीकास, छन्नी आदी बांधकाम साहित्य असल्याचे म्हंटले आहे. पुढील कारवाई सुरू आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा