- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Ranjit-ingle-murder-case-akl: रणजित इंगळे हत्याकांडातील आरोपीस दिल्लीत केली अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार 24
अकोला: जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीतील वाशिम बायपास येथे घडलेल्या प्रा. रणजित इंगळे याचे खुन प्रकरणातील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने निष्पन्न करून आरोपीस दिल्ली येथुन केली अटक केली. आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता १७ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
१७.०६.२०२३ रोजी रात्री पोलीस स्टेशन जुने शहर हद्दीतील वाशिम बायपास येथे अनओळखी इसमाने आपली ओळख लपवुन रंजित इंगळे राहणार गिता नगर, वाशिम बायपास यांचा खुन केला होता. त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन जुने शहर अकोला येथे दिनांक १८.०६.२०२३ रोजी अनओळखी आरोपी विरुध्द अप.क्र. १८९ / २३ कलम ३०२, भा.द.वि अन्वये गुन्हा नोंद करून तपासात घेण्यात आला सदर गुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांनी करून गुन्हयातील आरोपी निष्पन करून आरोपी दिल्ली येथे असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने स्थानिक गुन्हे शाखेतील तपास पथकाने दिल्ली येथे जावुन खुन प्रकरणातील आरोपीस कायदेशिर रित्या ताब्यात घेवुन अकोला येथे आणुन पुढील तपासकामी नमुद आरोपी यास पोलीस स्टेशन जुनेशहर अकोला यांचे ताब्यात दिले. पुढील तपास पोलीस स्टेशन जुनेशहर करीत आहे. आरोपी कडून अद्याप हत्याचे कारण समोर आले नाही. तपासा दरम्यान हत्येचे गुढ लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.
ही कारवाई पोलीस अधिक्षक संदिप घुगे, अपर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे ,उपविभागीय पोलीस अधिकारी, शहर विभाग सुभाष दुधगावंकर यांचे मागर्दशना खाली पोलीस निरीक्षक, प्रदीप शिरस्कार स्थानिक गुन्हे शाखा, अकोला पोउपनि सागर हटवार, ना.पो.कॉ अब्दुल माजिद, रविंद्र खंडारे, पो.शि. भिमराव दिपके, संतोष दाभाडे, चालक पोलीस अमलदार अक्षय बोबडे स्थानिक गुन्हे शाखा, अकोला यांनी केली.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा