akola-gandhi-road-shops-fire: गांधी रोडवरील आगीत सहा दुकानांचे अतोनात नुकसान




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: गांधी रोडवर मध्य रात्री लागलेल्या आगीत नुकसान झालेल्या दुकानांची आज सकाळी महापौर शारदा खेडकर आणि स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी पाहणी केली. 





अकोला महानगरपालिका क्षेत्रातील गांधी रोड स्थित आशा स्टोअर, बाबा कलेक्शन, श्री दत्त फ्रेमिंग वर्क्स, सदगुरू गारमेन्ट, पूजा इलेक्ट्रिकल्स, साई फ्रेमिंग सेंटर व बिंदी घरला काल रात्री आग लागली होती. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत १९ ते २० फायर टेंडर गाड्यांच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र आगीचे कारण अद्याप समोर आले नाही. या आगीत सहा दुकानांचे अतोनात आर्थिक नुकसान झाले आहे. 



दोषी आढळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार- विजय अग्रवाल 


आज महापौर शारदा खेडकर आणि स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी भेट देऊन पाहणी केली व व्यापा-यांशी संवाद साधून त्यांचे म्हणने ऐकुन घेतले व दुकानदाराची विचारपूस केली तेव्हा दुकानदारांनी अग्निशामक विभागाबद्दल तक्रार केली असता स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी दोषी आढळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. 

    

    

यावेळी सभागृहनेता पवन महल्ले, विरोधी पक्षनेते डॉ जिशान हुसेन, नगरसेवक रफीक सिद्दीकी, हरिष आलिमचंदानी, सिध्दार्थ उपरवट, ॲड. देवाशिष काकड, संतोष डोंगरे, नगरसेविका उषा वीरक, ॲड. कल्पना गोटफोडे, चंदा शर्मा, सामाजिक कार्यकर्ते रणजीत खेडकर, संजय गोटफोडे, संतोष पांडे, मनपा उपायुक्त विजय पारतवार, सहायक आयुक्त राजेश सरप, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष कथले, सहायक अतिक्रमण निर्मुलन अधिकारी प्रवीण मिश्रा, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक शैलेश पवार, कनिष्ठ अभियंता राहूल राऊत आदींची उपस्थिती होती. 


गांधी रोड परिसरातील आगीच्या घटनेची मनपा आयुक्त यांच्याव्दारे पाहणी


अकोला महानगरपालिका क्षेत्रातील गांधी रोड वर स्थित आशा स्टोअर, बाबा कलेक्शन, श्री दत्त फ्रेमिंग वर्क्स, सदगुरू गारमेन्ट, पूजा इलेक्ट्रिकल्स, साई फ्रेमिंग सेंटर ला काल रात्री आग लागली होती. त्या अनुषंगाने मनपा आयुक्त सुनिल लहाने यांनी घटना स्थळाची पाहणी केली व व्यापा-यांशी संवाद साधला. या दरम्यान आमदार  वसंत खंडेलवाल यांनी मनपा आयुक्त यांना अग्निशमन विभागाच्या गाड्या उशीरा आल्याबाबत कळविले असता मनपा अग्निशमन अधिकारी यांनी आमदार यांना सविस्तर माहिती दिली. तसेच यावेळी आमदार  खंडेलवाल यांनी अग्निशमन विभागात एक अतिरिक्त फोन क्रमांक कार्यानवीत करणे बाबत सुचना दिली.   

    

    

यावेळी मनपा उपायुक्त विजय पारतवार, सहा.आयुक्त राजेश सरप, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष कथले, सहायक अतिक्रमण निर्मुलन अधिकारी प्रवीण मिश्रा, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक शैलेश पवार, कनिष्ठ अभियंता राहूल राऊत आदींची उपस्थिती होती. 



टिप्पण्या