- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
madhukarrao kamble passed away: माजी राज्यमंत्री मधुकरराव कांबळे काळाच्या पडद्याआड, दीर्घ आजाराने निधन
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
file photo
भारतीय अलंकार 24
ॲड. नीलिमा शिंगणे जगड
अकोला: राष्ट्रीय लहुशक्ती संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य तथा माजी राज्य मंत्री मधुकरराव आनंदराव कांबळे यांचे आज, दिनांक 25 जुलै रोजी सकाळी 4 वाजता वयाच्या 70 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले आहे. त्यांची अंत्ययात्रा उद्या 26 जुलै रोजी दुपारी 1 वाजता राहते घर चौथा माळा, आर्या रेसीडेंसी, शास्त्री नगर अमानखाँ प्लॉट, अकोला येथून निघेल. त्यांच्या मागे पुत्र पंकज, परिमल, पराग असा मोठा आप्त परिवार आहे.
मधुकरराव कांबळे यांचा जीवन प्रवास
file photo
मधुकरराव कांबळे यांचे मुळगाव शेंदला ता. मेहकर जि. बुलढाणा आहे. त्यांनी B.Sc. (S.Y. Bio) शिक्षण पूर्ण केले . विद्यार्थी दशेत त्यांनी विद्यार्थी चळवळी गाजविल्या. यानंतर त्यांनी 1975 मध्ये समाज कार्यास सक्रीय सुरुवात केली. पुढे 1978 मध्ये ते राजकीय कार्यात सक्रीय झाले. 1980 हिंदू विरोधी धर्मातर चळवळीला कडवा विरोध करण्यासाठी आंदोलने केली.
1983 मध्ये विदर्भ विकास महामंडळ (महाराष्ट्र शासन अंगीकृत) संचालक पद त्यांनी भूषविले. यानंतर 1984 मध्ये सामाजिक न्याय व समतेसाठी संघर्ष व जनजागृती मोहीमेसाठी दलित समता परिषदेची स्थापना केली. याचवर्षी त्यांची महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजना समिती (महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई.) सदस्यपदी नियुक्ती झाली. 1985 मध्ये लहु शक्ती महाराष्ट्रची स्थापना करून संस्थापक अध्यक्ष राहिले.
1993 मध्ये महात्मा फुले मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ (महाराष्ट्र शासन) अध्यक्षपदी नियुक्ती झाली.
1995-1996 मध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मारक समिती (नागपूर,महाराष्ट्र शासन) सदस्य राहिले.
1997 मध्ये कांबळे यांनी हिंदू दलितांची अस्मिता जागृत करण्यासाठी काळाराम मंदिर, नासिक पासून 47 दिवस पुर्ण महाराष्ट्रभर अस्मिता यात्रा काढून मुंबई येथे समारोप केला.
2003 मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला. प्रदेश उपाध्यक्ष, भाजप महाराष्ट्र राज्य, प्रदेश अध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा भाजप महाराष्ट्र राज्य, प्रदेश चिटणीस भाजप महाराष्ट्र राज्य अश्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पुर्ण केल्यात.
माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस (विद्यमान उपमुख्यमंत्री) यांच्या नेतृत्वातील शासनामध्ये 2017 मध्ये स्थापित झालेल्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक समिती महाराष्ट्र शासन यामध्ये उपाध्यक्ष / सदस्य सचिव पदी (राज्यमंत्री दर्जा) नियुक्ती होती.
भारतीय अलंकार न्यूज 24 परिवार तर्फे मधुकरराव कांबळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
Akola
Buldana
Devendra Fadnvis
Hindu Dalits
lahu Shakti
Madhukarrao Kamble
Mumbai
passed away
State Minister
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा