- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Heavy-rains-in-Akola-old-city: अकोला शहरात मुसळधार पाऊस;दहा वर्षीय बालक नाल्याच्या पुरात गेला वाहून, जुने शहरातील घटना, शोध मोहिम सुरू
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार 24
अकोला: शहरात पावसाची संततधार सुरू आहे. नदी नाले ओसंडून वाहत आहेत. या पावसात बुधवारी खैर मोहम्मद प्लॉट परीसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील नाल्याच्या पुरात 10 वर्षाचा मुलगा वाहून गेल्याचे वृत्त समोर आले आहे.या मुलाचे नाव जियान अहमद इक्बाल अहमद (रा. खैर मोहम्मद प्लॉट) असे असल्याचे कळते.
पावसाच्या पाण्यात खेळण्यासाठी जियान आणि त्याचे मित्र घराबाहेर खेळत होते. मुले रस्त्यावर खेळत होती. दरम्यान जीयान याची चप्पल नाल्याच्या पाण्यात गेली. चप्पल वाहत असताना ती पकडण्यासाठी जीयान त्यामागे जावू लागला. पाण्याचा आणि नाल्याचा अंदाज न आल्याने जियान पाण्यात वाहून गेला.
जुने शहर पोलिस आणि मनपा अग्निशमन विभागाचे आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. रात्रीचा अंधार आणि मुसळधार पावसामुळे शोध मोहिमेत अडथळे येत आहे. मात्र युद्धपातळीवर शोध मोहीम काम सुरू आहे. दरम्यान परिसरातील एका सिसीटिव्ही मध्ये बालक वाहत गेल्याचा धक्कादायक घटनाक्रम दिसत आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा