heavy rain: मुसळधार पावसात नाल्यात वाहून गेलेल्या बालकाचा अखेर चार दिवसानंतर लागला शोध;भोंड येथे आढळला मृतदेह






भारतीय अलंकार 24

अकोला: येथील खैर मोहम्मद प्लॉट शरीफ नगर कब्रस्तान नाल्यातुन 12 जुलै रोजी मोर्णानदीत वाहुन गेलेल्या दहा वर्षिय जियान कुरेशीचा मृतदेह 15 जुलै रोजी सकाळी भोंड गावा जवळील मोर्णानदीच्या काठावर असलेल्या जलकुंभीवर भोंड येथील शेतक-यांना दिसुन आला.


अकोला येथील सर्व यंत्रणा जियान कुरेशीच्या शोध कार्यात सहभागी होती.


अकोला येथील खैर मोहम्मद प्लाॅट शरीफ नगर कब्रस्तान नाल्यातुन जिहान कुरेशी वय वर्ष अंदाजे दहा हा 12 जुलै रोजी सायंकाळी नाल्यातुन वाहुन तो पुढे मोर्णा नदीच्या पुरात वाहून गेला होता.या शोध कार्यात 12 जुलै पासुन अकोला जिल्हाधिकारी निमा अरोरा ,अकोला जिल्हा पोलीस अधिकारी संदीप घुगे यांच्या आदेशाने आरडीसी डाॅ.जावळे तहसीलदार सुनील पाटील  यांच्या नेतृत्वाखाली आणी अ.जि.आ.अधिकारी संदीप साबळे  यांच्या सहकार्याने अकोला आपत्ती व्यवस्थापन टीमचे सुनिल कल्ले,हरीहर निमकंडे, दिपक सदाफळे जिवरक्षक, आणी पिंजर येथील मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाची टीम, काटेपुर्णा येथील वंदे मातरम् आपत्कालीन पथक आणि आज सहभागी झालेले एसडीआरएफ टीम नागपुर,अग्निशमन दलाची टीम सह पोलीस विभागांची टीम व विशेषतः स्थानिक व नातेवाईकांसह या शोध कार्यात सहभागी होऊन परीश्रम घेत असताना आज 15 जुलै रोजी सकाळी भोंड येथील शेतक-यांना अकोला तालुक्यातीलच भोंड जवळ मोर्णा नदीपात्रातील जिहान कुरेशीचा मृतदेह जलकुंभीवर तरंगताना आढळला. माहीती मिळताच लगेच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेऊन हा मृतदेह जिहान कुरेशीचाच असल्याची खात्री झाली आणी ओळख पटली. या संपुर्ण परीस्थितीवर अकोला जिल्हाधिकारी निमा अरोरा ,अकोला पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि आरडीसी डाॅ. जावळे ,अकोला म.न.पा.आयुक्तांसह लक्ष ठेऊन होते. अग्निशमन अधिकारी मनियार ,डाबकी रोड पो.स्टे.चे केदार  हे पोलीस टीमसह पुर्ण वेळ सोबत होते, अशी माहिती पथक प्रमुख दिपक सदाफळे जिवरक्षक यांनी दिली आहे.

टिप्पण्या