- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार 24
अकोला: मुर्तीजापुर पोलीस स्टेशनला आरोपी सोनू उर्फ अभिजित किशोर जाधव विरुद्ध अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत अतिप्रसंग केल्याबद्दल मुलीच्या तक्रारीवरून मुर्तीजापुर पोलीस स्टेशन येथे भारतीय दंड. विधान कलम 363,366,376 व पोक्सो अधिनियम ची कलम 3 व 4 अन्वये गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली होती. ही घटना 2014 मध्ये घडली होती.
त्यानंतर आरोपी विरुद्ध अकोला जिल्हा व सत्र न्यायालय येथे खटला चालविण्यात आला असून आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
या खटल्यात सरकारपक्षातर्फे एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले. आरोपीतर्फे करण्यात आलेले युक्तिवादात गुन्हा नोंदविण्यास उशीर व साक्षीदारांच्या बयाणात तफावत असल्या कारणाने आरोपी विरुद्ध गुन्हा सिद्ध होऊ शकला नाही. म्हणून न्यायालयाने 10 जुलै 2023 रोजी आरोपीची निर्दोष मुक्तता केली.
या खटल्यात आरोपीतर्फे ॲड. राकेश पाली, ॲड. आनंद साबळे, ॲड. नागसेन तायडे व ॲड. कल्याणी तायडे (अकोला) यांनी युक्तिवाद केला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा