- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
unfortunate death of a child: मोर्णा नदीवरील निर्माणाधीन पुलाच्या खड्यात पडून बालकाचा दुर्दैवी मृत्यू : पुलाचे काम कधी पुर्ण होणार;संतप्त नागरिकांचा सवाल
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
ॲड. नीलिमा शिंगणे जगड
अकोला: अकोट फाइल पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नायगांव वाकापूर मार्ग स्थित मोर्णा नदी वरील निर्माणाधीन पुलासाठी खोदलेल्या खड्डयात पाणी साचल्याने काही बालक पोहण्यासाठी उतरले. मात्र खड्डा खोल असल्याचा अंदाज न आल्याने शेख रिजवान शेख असलम नावाचा अंदाजे १३ वर्षीय बालकाचा पाण्यात बुडून मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना गुरूवारी दुपारी घडली.
घटनेची माहिती नागरिकांनी तात्काळ मनपा अग्निशमन दल विभाग तथा अकोट फाइल पोलीस ठाण्यात दिली. यानंतर लगेच पोलीस आणि अग्निशमन दल विभाग घटनास्थळी पोहचले. स्थानीय नागरिकांच्या सहकार्याने बालकास बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन विभाग द्वारा पाण्यात गळ टाकल्यानंतर बालकास बाहेर काढण्यात यश मिळाले. मात्र तोपर्यंत बालकाचा मृत्यू झाला होता.
प्राप्त माहितीनुसार ठेकेदार द्वारा मोर्णा नदी वर पुल निर्माण करण्यासाठी जो गड्ढा खोदलेला आहे, त्याची खोली ४० ते ५० फुटाच्या जवळपास सांगितल्या जात आहे. हे कार्य ठेकेदार द्वारा २० दिवसापासून प्रलंबित ठेवले गेले आहे. या संबंधित संतप्त स्थानिक नागरिकांनी अधिक माहिती घेतली असता, ठेकेदार यांना कामगार मिळत नसल्याने काम बंद ठेवावे लागले. या संदर्भात स्थानीक नागरिकांनी अनेकदा संबंधित विभागात तक्रार केली. कासव गतीने पुलाचे निर्माण कार्य सुरू असल्याने काही दिवसा पूर्वीच एका शेतकऱ्याचा शेती माल नदीत पडल्या कारणाने मोठे नुकसान झाले होते. असे छोटे मोठे अपघात निर्माणाधीन पुलावर होणे रोजचेच झाले होते. मात्र आज या निर्माणधीन पुलाने बालकाचा बळी घेतला. वेळीच हा पुल निर्माण झाला असता, तसेच खोल खड्यास सुरक्षा दिली असती तर कदाचित ही घटना घडली नसती. येथे कुठलीच सुरक्षा कठडे नसल्याने परिसरातील छोटी मुले रोज पोहताना दिसत होती. मात्र आज एका मुलाला यात आपला जीव गमवावा लागला.
घटनास्थळी गर्दी
घटनास्थळी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. रिजवान पाण्यात बुडाल्याचे माहित होताच मृतकाच्या घरी आणि परिसरात शोककळा पसरली.
तीन तास अथक प्रयत्न
बालकाला बाहेर काढण्यासाठी अग्निशमन विभाग, स्थानीक नागरिक आणि अकोट फाइल पोलिसांना अथक प्रयत्न करावे लागले. तीन तासाच्या कठोर मेहनती नंतर बालकाला बाहेर काढण्यात यश मिळाले. मात्र दुर्दैवाने त्याचा मृतदेहच हाती लागला.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा