Girls Hostel Murder Case: अकोल्यातील तरुणीची मुंबईत हत्या! संशयित आरोपीची आत्महत्या





भारतीय अलंकार 24

मुंबई/अकोला: मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरातील गर्ल्स हॉस्टेलमध्ये मंगळवारी एका तरुणीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. हॉस्टेल मधील चवथ्या माळ्यावरील एका खोलीचा दरवाजा तोडून पोलीस आत गेले असता त्यांना तरुणीचा मृतदेह आढळून आला.

पोलिसांनी युवतीचा मृतदेह ताब्यात घेवून शव विच्छेदन करिता रुग्णालयात पाठविला. प्रथम दर्शनी ही आत्महत्या असावी,असा कयास पोलीसांनी बांधला. मात्र अधिक तपास केला असता, तरुणीवर अतिप्रसंग करुन त्यानंतर तिची हत्या करण्यात आली असावी,असा संशय पोलिसांनी व्यक्त केला.




पोलीसांनी खोलीचे दार उघडले असता, मृतक तरुणीच्या गळ्याभोवती दुपट्यासारखा एक कपडा गुंडाळलेला आढळला. मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसला. पोलिसांनी तिचा मृतदेह खाली उतरविला. शव विच्छेदन साठी रुग्णालयात पाठविला. या आत्महत्येचा तपास सुरू असतानाच पोलिसांना संशयित आरोपीचा मृतदेह रेल्वे रुळावर आढळून आला. त्यामुळे  दोन्ही मृत्यूमागचे रहस्य वाढले.

तरुणीवर अतिप्रसंग करून तिची हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे. या घटनेनंतर हॉस्टेलमध्ये काम करणारा एक तरुण फरार झाल्याचे पोलीसांना कळले. हा तरुण वसतिगृहाच्या सर्व्हंट क्वार्टरमध्ये राहत होता. तो घटनास्थळी नसल्याने पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी काही अंतरावर रेल्वे ट्रॅकवर पोलिसांना त्याचा मृतदेहच आढळला.



संशयित आरोपी तरुणाचा मृतदेह चर्नी रोड रेल्वे स्टेशनच्या रेल्वे रुळावर पोलीसांना मिळाला. नातेवाईकांकडून तरुणाची ओळख पटली आहे, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी या घटनेतील एक धक्कादायक माहिती दिली आहे. या मुलीचा मृतदेह पंख्याला लटकलेला होता. त्यावेळी तिच्या अंगावर फक्त आंतरवस्त्र होती. तसेच गळ्याभोवती दुपट्टासारखा कपडा होता.  तिच्या अंगावर जखमा दिसून आल्या. तिच्यावर बळजबरी केली असावी, असे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. या तरुणीचा शव विच्छेदन अहवाल हाती आल्यानंतर घटना कशी आणि का घडली हे समोर येईल, असे पोलीसांनी सांगितले.


मृतक संशयित आरोपी हा विवाहित होता. वडिलांसोबत तो त्याच हॉस्टेल मध्ये काम करत होता. त्याची पत्नी गावाला राहते. तो उत्तर प्रदेश मधील प्रतापगड जिल्ह्यातील रहिवासी आहे. रेल्वे ट्रॅकवर त्याचा मृतदेह आढळल्यानंतर त्याच्या वडिलांनी त्याच्या मृतदेहाची ओळख पटविली आहे. पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवला आहे. ही तरुणी हॉस्टेलच्या चौथ्या मजल्यावर राहत होती. तिचा मृतदेह खोलीत होता आणि खोली बाहेरून बंद होती. पोलिसांना तरुणीचा मृतदेह ज्या अवस्थेत आढळला आहे, त्यावरून तिच्यावर अतिप्रसंग झाल्याचे स्पष्ट होते, असे पोलिसांनी सांगितलं.




मृतक तरुणी ही विदर्भातील अकोला शहरातील रहिवासी आहे. मुंबईत सुरक्षित समजल्या जाणाऱ्या  सावित्रीबाई फुले वसतिगृहात राहून शिक्षण घेत होती. विद्यार्थीनीची हत्या केल्यानंतर अटक होण्याच्या भीतीने या तरुणाने आत्महत्या केली असावी, अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. दरम्यान मंगळवारी सायंकाळी मुंबईहून पोलिसांचा मुलीच्या पालकांना फोन कॉल आला. मुलींच्या पालकांना तातडीने मुंबईला बोलवून घेतले. मुलीचे वडिल लगेच अकोलाहून मुंबईकडे रवाना झाले. या घटनेची अकोल्यात माहिती होताच शहरात शोककळा पसरली. मृत तरुणी ही अकोल्यातील असून ती मुंबईतील वांद्रे येथील एका  महाविद्यालयात पोलिटेक्निकलचे शिक्षण घेत होती. वसतिगृहातील एक सुरक्षा रक्षक हा नेहमी तिला त्रास द्यायचा, याबाबत तिने आपल्या वडिलांना सांगितले होते.  येत्या दोन- तीन दिवसांमध्ये ती अकोल्यात येणार होती. त्यासाठी तिने रेल्वेचे तिकीटही काढले होते. 




दरम्यान या प्रकरणाची दखल राज्याच्या गृहखात्याने घेतली आहे.


टिप्पण्या