Eviction action: वाहनतळ जागेचा गैरवापर: मनपाची दिशाभुल करणाऱ्या कापड दुकानावर चालला बुलडोझर




ठळक मुद्दा 

मनपा अतिक्रमण विभागाव्‍दारे पुर्व झोन अंतर्गत संस्‍कार क्रिएशन दुकानाच्‍या चुकीच्‍या पध्‍दतीने बांधण्‍यात आलेल्‍या रॅम्‍पच्‍या बांधकामावर निष्‍कासनाची कारवाई.


 




भारतीय अलंकार 24

अकोला:  खुले नाटयगृह जवळील  संस्कार क्रिएशन या कापड दुकानाच्या तळमजल्यावर उभारण्यात आलेल्या रॅम्पवर बुलडोझर चालवून महानगर पालिकेने गुरूवारी हा अवैध रॅम्प काढला. वाहन तळाच्या नावाने बांधण्यात आलेल्या तळमजल्याचा वापर दुकानदार माल ठेवण्यासाठी करत असल्याने ही कारवाई करण्यात आली. 




तळमजल्यातील वाहनतळाचा उपयोग  दुकांनातील माल ठेवण्यासाठी होत असल्याने येथे आलेल्या ग्राहकांना आपली वाहने दुकानासमोर लावावी लागत होती. वाहनाची ही रांग थेट रस्त्यावर येत असल्याने वाहतूक कोंडी नित्याची बाब झाली होती. एका तक्रारी वरून मनपाने गुरूवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास या दुकानावर कारवाई करुन अवैध बांधकाम तोडले. तसेच वाहन तळाचा उपयोग वाहन ठेवण्यासाठीच करावा, याबाबत सूचित केले.





अकोला महानगरपालिका पुर्व झोन अंतर्गत खुले नाट्य गृह समोरील संस्‍कार क्रिएशन या दुकानदाराव्‍दारे पार्कींगच्‍या जागेवर वाहन न ठेवता दुकानासमोरील रस्‍त्‍यावर वाहने ठेवण्‍यात येत असल्‍यामुळे त्‍या रस्‍त्‍यावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी निर्माण होत होती. यामुळे त्‍या  परिसरातील नागरिकांनी याबाबत मनपात तक्रार दिली होती. गुरुवार 15 जून 2023 रोजी मनपा आयुक्‍त तथा प्रशासक कविता व्दिवेदी यांच्‍या आदेशान्‍वये त्‍या रस्‍त्‍यावर लावण्‍यात आलेल्‍या गाड्या टोईंग पथकाव्‍दारे जमा करण्‍यात आल्‍या. तसेच पार्कींगच्‍या ठिकाणी वाहने लावण्‍याकरिता चुकीच्‍या पध्‍दतीने तयार करण्‍यात आलेल्‍या रॅम्‍पच्‍या  बांधकामावर मनपा अतिक्रमण विभागाव्‍दारे निष्‍कासनाची कारवाई करण्‍यात आली.



ही कारवाई सहा.नगररचनाकार राजेंद्र टापरे, सहा. अतिक्रमण अधिकारी चद्रशेखर इंगळे, प्रवीण मिश्रा, कनिष्‍ठ अभियंता तुषार जाने, मनपा अतिक्रमण विभागातील आणि अभिकर्ताचे कर्मचा-यांची यांनी केली.  




                                                 

टिप्पण्या