- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
*शिवजी आणि किन्नरांची कथा सुरु केली आणि अचानक किन्नरांचा झाला प्रवेश
*प्रचंड गर्दीमुळे किन्नरांना महाराजांपर्यंत पोहोचता आले नाही, तेव्हा महाराजांनी त्यांना पाहून कथा थांबवली आणि त्यांना व्यासपीठावर बोलावले
*सर्व किन्नरांचे पंडित प्रदीप मिश्रा यांचे भक्तिभावाने केले स्वागत, किन्नरही झाले भावुक
*कथा ऐकून भावूक झालेल्या सर्व किन्नरांनी नाचून संपूर्ण कथा मोठ्या उत्साहाने ऐकली.
*अकोल्यात शिवपुराण दिनाच्या दुसऱ्या दिवशी भक्तीगाथा ऐकण्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविकांची गर्दी
*श्री स्वामी समर्थ शिव महापुराण महाकथेचे दुसरे पुष्प गुंफतांना केले कथन
भारतीय अलंकार 24
ॲड. नीलिमा शिंगणे जगड
अकोला: भगवान ब्रम्ह आणि विष्णू यांनी सृष्टी निर्माण करण्याची जबाबदारी भगवान महादेवावर दिल्यानुसार भगवान शिव यांनी सृष्टी निर्माण करतांना अर्धे पुरुष आणि अर्धे नारी निर्माण करण्याच्या सूचनेनुसार मनुष्य निर्माण केलेत. त्यामुळे किन्नरांची निर्मिती पुरुष आणि स्त्रियांच्या आधी झाल्याने पृथ्वीतलावर सर्वात पहिला अधिकार किन्नरांचा आहे, असे उदाहरणांसह शनिवार दि. 6 रोजी अकोल्यातील म्हैसपूर येथे आयोजित श्री स्वामी समर्थ शिव महापूराण कथेच्या दुसऱ्या दिवशी लाखों भाविकांच्या उपस्थिती मध्ये सांगितले.
नियमितपणे शिव महापुराण कथेच्या दुसऱ्या दिवसाच्या कथेची सुरुवात करत असतांनाच अचानक कथा श्रवण स्थळी किन्नरांचा एक गट येत असतांना, त्यांना दाटीवाटीने बसलेल्या भाविकांची गर्दीतून वाट काढत किन्नरांचा गट येत असल्याचे पाहून कथा वाचक पं प्रदीप मिश्रा महाराज यांनी कथा वाचन थांबवत किन्नरांना व्यासपीठाकडे बोलावले आणि किन्नरांनी पुष्पहार टाकून प्रदीप महाराजांचे दर्शन घेतले. त्यानंतर महाराजांनी कथेचा विषय बद्दलवून शिवजी आणि किन्नर कथा वाचनाला प्रारंभ केला. या कथेत आनंदित होऊन किन्नरांनी नृत्य करीत कथा श्रवण केली.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा