spirituality-shiv-mahapuran-katha: सृष्टीचे रक्षण करण्यासाठी भगवान शिवाने विष प्यायले - पंडित प्रदीप मिश्रा; अकोला येथील शिव महापुराण कथा समाप्ती






भारतीय अलंकार 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: चांगले आणि वाईट दोन्ही अस्तित्वात आहे. नकारात्मक ऊर्जेचा आपल्यावर परिणाम होण्यापासून रोखण्याची कला शिकण्याची गरज आहे, हेच भगवान शिव आपल्या भक्तांना शिकवितो. समुद्रमंथनाच्या वेळी सृष्टीचे रक्षण करण्यासाठी भगवान शिवाने हलाहल विष प्यायले होते. यामुळेच भगवान शिवाला निळकंठ नाव प्राप्त झाले, असे शिव महापुराण कथा समाप्ती दिनी पंडित प्रदीप मिश्रा यांनी सांगितले.






जगात लोखंड हे सर्वात बलवान आहे, ज्यापासून तलवारी बनतात. पण आग लोखंडापेक्षाही बलवान असते. ती लोखंड सुध्दा पिघळविते. आणि पाणी आग विझवते. मात्र माणूस पाणी पितो. पण रोग माणसावर हावी होते. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे महादेव प्रत्येक रोगाचा नाश करतो, म्हणून महादेव सर्वात शक्तिशाली आहे. कारण महादेव भक्तांची सर्व दु:खं तो पितो. मात्र भगवान महादेव नशा करतो असे काही लोक वल्गना करतात. आणि भगवान शिव दारू, गांजा,भांग पितात ,असे म्हणत देवाची बदनामी करीत असतात. देव नशा करतो हे सर्व खोटे आहे. कारण देव भक्तांचे दु:ख पितात.  समुद्रमंथनात सापडलेले विषही भगवान शिवाने प्यायले. त्यामुळे त्यांचा कंठ विषाने निळा झाला. म्हणूनच भगवान शिवाला नीलकंठ म्हणतात. भगवान शिवाने देशाच्या विविध ठिकाणी असे काही रूप दाखवले, ज्यामुळे त्यांना 12 ज्योतिर्लिंग म्हणून ओळख मिळाली.  स्वामी समर्थ श्री शिव महापुराण कथेची आज भगवान शंकराची विविध रूपे आणि त्यांच्या कथा पंडित मिश्रा यांनी सांगून समाप्ती केली.






म्हैसपूर येथील शिव महापुराण कथा आयोजक रुपेश चौरसिया आणि विजय दुबे परिवाराने पूजा करून शिव महापुराण कथेला शिवशंकराच्या जयकाराने प्रारंभ करण्यात आला   होता. यावेळी लाखोंच्या संख्येने महिला भविकांसह भाविक उपस्थित होते.  याच भविकांच्या उपस्थिती मध्ये वृन्दावन निवासी बाल कथावचक श्रीकृष्ण महाराज दुबे यांच्या वाणीतून दुपारी साडे तीन ते साडे सहा यावेळेत श्रीमत भागवत कथा सुरू होती.  





या कथेला ऐकण्यासाठी भाविकांची दररोज लाखोंच्या संख्येने भर पडत होती. श्री स्वामी समर्थ शिव पुराण कथेची समाप्ती असल्याने आज भाविकांच्या उपस्थितीची संख्या 10 लाखांच्यावर असल्याचे सांगण्यात आले आहे. आज पं प्रदीप महाराज मिश्रा यांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित भाविकांचा निरोप घेतला.

टिप्पण्या