railway accident: रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे प्रवासीचे वाचले प्राण




भारतीय अलंकार 24

अकोला : अकोला रेल्वे स्थानकावर मंगळवारी मोठी दुर्घटना टळली. आरपीएफ अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे दोन जीव वाचले आहे.



मंगळवारी अकोला रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर दुपारी 12.15 च्या सुमारास ओडिशाहून भुवनेश्वर एलटीटी एक्सप्रेस गाडी  क्रमांक 12880 ने शिर्डीला जाणारे शरद साहू आणि सौरभ साहू हे दोघे पाण्याच्या बॉटल भरण्यासाठी अकोला प्लॅटफॉर्मवर उतरले असता, रेल्वे धावू लागली आणि दोघेही धावत धावत चालत्या ट्रेनमध्ये बसण्याचा प्रयत्न करू लागले. अशातच दोघे प्लॅटफॉर्मवर पडले, आणि त्यातून शरद साहू चालत्या ट्रेनखाली गेला. तो प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या मध्ये पडला. तिथे उपस्थित अकोला आरपीएफ स्टेशन हेड ऑफिसर युनूस खान यांनी खाली पडलेल्या शरद साहूला ताबडतोब प्लॅटफॉर्मच्या भिंतीला चिकटून राहण्यास सांगितले. आणि त्याचा आत्मविश्वास वाढवला.  ट्रेन थांबवण्यात आली. त्यानंतर शरदला लगेच खालून  वर बाहेर काढण्यात आले. रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे दोन जीव वाचल्याने सर्वत्र पोलिसांचे कौतुक होत आहे.



टिप्पण्या