- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
"दंगली मागे केरलाची नव्हे तर कर्नाटकाची स्क्रिप्ट"- नाना पटोले
भारतीय अलंकार 24
ॲड. नीलिमा शिंगणे जगड
अकोला : 26/11 ची घटना नाना पटोले यांनी घडवून आणली होती, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लावला आहे. तर काही पुरावे असतील तर फडणवीसांनी मला जेलमध्ये टाकून द्यावे, पण ही वेळ थट्टा करण्याची नाही, असा पलटवार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. ते गुरुवारी अकोल्यात दंगल ग्रस्त्त भागाला भेट देण्यासाठी असतांना माध्यमांशी बोलत होते.
परमबीर सिंगला ज्या पद्धतीने माफीचा साक्षीदार सांगितला जातो, निर्दोष सोडण्यात आलेला आहे. या सगळ्यांची उत्तर फडवणीसांनी द्यावे, असेही पटोले म्हणाले. परमबीर सिंगचा हा विजय नाही तर महाराष्ट्राला कलंक लावण्याचा काम एका आयपीएस अधिकाऱ्याने केला असल्याची टीका ही पटोले केली.
"दंगली मागे केरलाची नव्हे तर कर्नाटकाची स्क्रिप्ट"
राज्यात होत असलेल्या दंगली मागे केरलाची नव्हे तर कर्नाटकाची स्क्रिप्ट असल्याचंही पटोले म्हणाले. मात्र,खरी स्क्रिप्ट कर्नाटक की केरला याचा उलगडा लवकर होणार असल्याचे देखील पटोले यावेळी म्हणाले.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा