akola-to-kapsi-traffic-diverted: महाशिवपुराण कथामुळे अकोला ते कापशी मार्गावरील वाहतूक बंद; पर्यायी मार्गाने वळविली वाहतूक




भारतीय अलंकार 24

अकोला: म्हैसपूर (अकोला) येथे 05 ते 11 मे या कालावधीमध्ये प्रदिप मिश्रा सिहोरवाले यांचे महाशिवपुराण कथा कार्यक्रमाची सुरवात झालेली आहे.  कथा कार्यक्रमामध्ये अकोला जिल्ह्यासह राज्यभरातून भाविक व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले असून, अधीक मोठ्या प्रमाणामध्ये  कार्यक्रमास भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यामध्ये भाविकांची आणि नागरिकांची गैरसोय होऊ नये, याकरिता अकोला ते कापशी मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली असून, पर्यायी मार्गाने वाहतूक वळविन्यात आली आहे. 


शुक्रवारी पहिल्या दिवशी कथा कार्यक्रमाचे ठिकाणी जाणे-येण्यास वाहतूक करणारे नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. कथा कार्यक्रम मार्गावर पहिल्या दिवशी काही किरकोळ स्वरुपातील अपघात  देखिल झाले.  अशा प्रकारच्या घटनेमुळे कार्यक्रमाचे ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याबाबत पोलीस अधीक्षक, अकोला यांनी जिल्हाधिकारी यांना सांगितले.




यानुसार कथा कार्यक्रमामध्ये सहभागी होणारे सर्व भावीक नागरिक यांचे सुरक्षेच्या दृष्टीने तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहणे करीता  05 मे  चे रात्री 12.00 वा पासून ते  11 मे चे 24.00 वाजे पर्यंत वाशिम बायपास ते पातूर या मार्गावरील वाहतूक बंद जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून करण्यात आली. सोबतच पर्यायी मार्गाने वाहन जावू शकतील,असे आदेशात म्हटले आहे.



वाहतुकीव्दारे कथा कार्यक्रमास सहभागी होणारे भावीक नागरिक,    रविवार 07 मे रोजी आयोजीत नीट परिक्षेकरीता वाहतूक करणा-या विद्यार्थी यांची वाहने वगळून, जड वाहनांकरीता वाहतूक पूर्ण पणे बंद करून पर्यायी मार्गाने वळविण्याची आवश्यकता असल्याबाबत पोलीस अधीक्षक अकोला यांनी प्रस्तावीत केले. 



पोलीस अधीक्षक, अकोला यांनी प्रस्तावित केल्यानुसार, शिवमहापुराण कथा कार्यक्रमातील गर्दी व्यवस्थापन करीता तसेच रस्त्यावरील रहदारी ही नियंत्रणात राहण्याचे दृष्टीने व अपघाताची विपरीत घटना घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये; यास्तव चर्चा करण्यात आली. 



पातूर कडून अकोला कडे येणारी जाणारी जड़ वाहतूक पर्यायी मार्गाने वळविणे आवश्यक आहे. पोलीस अधीक्षक, अकोला यांनी प्रस्तावित केल्यानुसार, नीमा अरोरा, भा.प्र.से, जिल्हा दंडाधिकारी अकोला तथा जिल्हाधिकारी अकोला यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33 (1) (ख) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान्वये  05 मे 12.00 वा पासून ते  11 मे  24.00 वा पर्यंत वाहतुकीव्दारे  म्हैसपूर  अकोला येथील शिवमहापुराण कथा कार्यक्रमास सहभागी होणारे भावीक नागरिक यांची वाहने,  07 मे रविवार रोजी आयोजीत नीट परिक्षेकरीता वाहतूक करणा-या विद्यार्थी यांची वाहने तसेच रुग्ण वाहिका, वैद्यकीय कामासाठी प्रवास करणारे वाहने वगळून पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली.या बाबतचे आदेश शुक्रवारी रात्री निर्गमित केले आहे.


वाहतूक मार्गात केलेला बदल 



टिप्पण्या