Akola riots : दंगली नंतर प्रथमच पोलीस अधीक्षक प्रसारमाध्यम समोर: दंगलीचा सूत्रधार साथीदारासह जेरबंद; मात्र दोघांचा करविता धनी कोण?




भारतीय अलंकार 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: जुने शहरात 13 मे रोजी उसळलेल्या दंगली नंतर प्रथमच अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे प्रसारमाध्यम समोर आले. शनिवारी त्यांनी पत्रकार परिषद बोलवून दंगल बाबत माहिती दिली. दंगल घडवुन आणणारे दोन्ही मुख्य आरोपीला जेरबंद केले असून, आता पर्यन्त 148 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच गुन्हयात 6 अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याचे घुगे यांनी सांगितले.


शनिवारी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात पत्रकार परिषद झाली.




काय म्हणाले पोलीस अधीक्षक 


13 मे 2023 रोजी पोलीस स्टेशन रामदास पेठ, अकोला येथे एका इसमाने  मुस्लीम धर्माचे देवता बाबत आक्षेपार्ह पोस्ट सोशल मिडीयाचे इंस्टाग्रामवर वायरल करून  समाजाचे भावना दुखावल्या, अशी तक्रार  अरबाज खान नासीर खान (वय 23 वर्षे रा. अकोला) याने  पोलीस स्टेशन रामदास पेठ अकोला येथे दिली होती. त्यानंतर 13 मे रोजी रात्री गैर कायद्याची मंडळी जमवुन 'अल्ला की शान मै गुस्ताकी हो गई' या कारणामुळे कट कारस्थान रचुन ठिकठिकाणी जुने शहर परिसरातील, हरीहर पेठ, पोळा चौक व इतर ठिकाणी जाळ पोळ व दगड फेक करून लोकांचे घरात घुसुन शासकीय व सार्वजनिक मालमत्तेचे मोठया प्रमाणात नुकसान करून लोखंडी पाईप व काठ्यांनी  लोकांना व पोलीसांना मारहाण केली. या मारहाणी मध्ये विलास महादेवराव गायकवाड (वय 40 वर्षे रा. हरीहर पेठ जुने शहर अकोला) या इसमाचा मृत्यु झाला.


 


काही लोकांनी घडवुन आणलेल्या दंगली बाबत पोलीस स्टेशन जुने शहर येथे 

1) 150/2023 कलम 143, ते 149, 307, 435, 353, 333, 336, 337, 427 भादंवि सह कलम 7 क्रिमीनल लॉ अमेंडमेंट सह कलम 3,4 सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान कायदा. 

2) 151 / 2023 कलम 143, 147, 148, 149, 435, 436, 427 भादंवि सह कलम 7 क्रिमीनल लॉ अमेंडमेंट सह कलम 3,4 सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान कायदा. 

3) 152/2023 कलम 302, 143, 147, 148, 149, भादंवि. 

4) 153/2023 कलम 143 ते 149, 435, 427, 295 भादंवि सह कलम 7 क्रिमीनल लॉ अमेंडमेंट सह कलम 3,4 सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान कायदा अन्वये गुन्हे नोंद करण्यात आले असुन नमुद गुन्हयात एकुण 102 आरोपीतांना अटक केली. या गुन्हयात सहा अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याचे तपास निष्पन्न झाल्याने त्यांना ताब्यात घेतले आहे.


पोलीस स्टेशन रामदास पेठ येथे दाखल अपराध क्रमांक 192/2023 कलम 153 (अ), 295 (अ), 188, 120 (अ), 505 भादंविचे तपासात असे निष्पन्न झाले की, या गुन्हयांतील फिर्यादी अरबाज खान नासीर खान (वय 23 वर्षे रा. अकोला) व एक इसम या दोघांनी एकमेकांचे मोबाईल फोन व्दारे सोशल मिडीया वर चॅटींग करून ती चॅटींग  सोशल मीडीया गृपवर प्रसारीत केली व वैयक्तीक चॅटींग सार्वजनिक केली. 'अल्ला की शान मै गुस्ताकी हो गई' अशी खोटी माहीती प्रसारीत करून कट कारस्थान रचुन लोकांना एकत्र बोलावुन दंगल घडवुन आणली. सदर गुन्हयात 44 आरोपी अटक करण्यात आले आहे. दंगल घडवुन आणणारे एकुण 148 आरोपीतांना अटक करण्यात आली आहे.


आरोपींना अटक करण्याची कार्यवाही पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक  मोनिका राउत , उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सुभाष दुधगांवकर यांचे मार्गदर्शनात व पोलीस अमलदार यांनी केली.




मुख्य आरोपींचा करविता धनी कोण?



अकोल्यात दोन गटात झालेल्या राडा मधील दोन मुख्य आरोपींना अटक करण्यात अकोला पोलिसांना यश आले आहे. समाजमाध्यमच्या माध्यमातून या आरोपींनी दोन गटात तेढ निर्माण केली होती. यानंतर अकोला शहरातील चार भागात तणाव निर्माण झाला होता. या चारही भागात संचारबंदी लावण्यात आली होती. यातील एका भागात सद्य परिस्थीतही जमावबंदी आणि संचारबंदी कायम आहे. या घटनेमुळे सामान्य जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आता घटनेच्या तब्बल आठ दिवसांनंतर अकोला पोलिसांनी मास्टर माईंड अरबाज खान आणि त्याच्या साथीदाराला अटक केली. विशेष म्हणजे खोटी तक्रार देणारा अरबाजच या मागचा मुख्य सुत्रधार असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी या दोघांना अटक केली असली तरी या दोघांचा कोणत्या देशविघाती संघटनेशी संबंध आहे का? या दोघांचा करता करविता आणि बोलविता धनी कोण?, याचा तपास पोलीसांनी करणे आवश्यक आहे.





टिप्पण्या