Akola crime: अकोटफाईल परिसरात तणाव: घटनास्थळी पोलिस ताफा; अफवांवर विश्वास ठेवू नये - जिल्हा पोलिस अधीक्षकांचे आवाहन





भारतीय अलंकार 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: अकोट फाईल परिसरात मंगळवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास दोन गटात हाणामारी झाल्याने गदारोळ झाला. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.



दोन्हीं गटातील हल्लेखोरांनी एकमेकांच्या वाहनांची तोडफोड  केली आहे. पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्यासह पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. संशयितांची धरपकड सुरूच आहे.






अकोला शहरातील अकोट फाइल शंकर नगर साबरीया चौक येथे दोन गट आमने-सामने आले. दोन्ही गटात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी घटनास्थळी पोहचून परिस्थिति हाताळली. 



ए एस पी  सचिन गुंजाल यांच्यासह सर्व पोलीस ठाण्याचे ठाणेदार आपल्या दल बल सह घटनास्थळी हजर आहेत. परिस्थिति नियंत्रणात आली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. सध्या अकोट फाईल परीसरात तणाव पुर्ण शांतता आहे. 






कोणत्याही प्रकारचा अफवावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये,असे आवाहन पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी केले आहे. सध्या दंगा करणाऱ्या काही आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील प्रक्रिया सुरू आहे. घटना मागील कारण अद्याप समोर आलेले नाही.




टिप्पण्या