water-issue-flares-up-telhara: पाणी प्रश्न पेटला: तेल्हारा तालुक्यात कडकडीत बंद: व्यापारी संघटनेने दर्शविला पाठिंबा





भारतीय अलंकार 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला:  वान धरणाचे पाणी पळवापळवीचे राजकरण पुन्हा नव्याने सुरू झालेले आहे. आता हा पाणी वाद चिघळला असून, महाराष्ट्र भर मुद्दा गाजत आहे. सिंचनासाठी असलेले येथील पाणी बाहेर जावू नये, यासाठी शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकही जिद्दीला पेटला आहे. व्यापाऱ्यांनी सुध्दा यास पाठींबा दिला असून तेल्हारा तालुक्यात आज मंगळवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. व्यापारी संघटनेने उत्स्फूर्त प्रतिसाद देत बाजारपेठ बंद दिवसभर ठेवली. एरव्ही गर्दी असलेले ठिकाण आज निर्मनुष्य दिसत आहे. 








जिल्ह्यातील बाळापूर आणि तेल्हारा तालुक्यात सध्या पाणी प्रश्नावर आंदोलन सुरू आहे.वान धरणाचे पाणी अकोला अमृत योजना आणि बाळापूर येथील 69 गावांना मिळविण्यासाठी ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी मागणी केली आहे. तर या निषेधार्थ लोकजागर मंचचे अनिल गावंडे यांचे गेल्या पाच दिवसांपासून वारी धरणावर धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आज संपूर्ण तेल्हारा तालुका बंदची हाक देण्यात आली आहे. 






या बंदला समस्त व्यापारी संघटनेने पाठिंबा दर्शवित तेल्हारा तालुक्यात कडकडीत बंद पाळला आहे. शासनाने अकोला अमृत योजना तसेच बाळापूर 69 खेडी पाणीपुरवठा योजनेचा निर्णय कायमस्वरूपी रद्द करावा या मागणीसाठी सदर आंदोलन सुरू आहे.



New update 


दरम्यान, वारी येथे सुरू असलेल्या या आंदोलनाची दखल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. याबाबत त्यांच्या कार्यालयात मे महिन्यात बैठक घेऊन तोडगा काढण्यासाठी प्रशासनाला आदेशित केले आहे. त्यामुळे पाच दिवसांपासून सुरू असलेले हे आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आले आहे.


टिप्पण्या