savarkar-gaurav-yatra-in-akola: अकोल्यात स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद; हजारों सावरकर प्रेमींचा यात्रेत सहभाग





भारतीय अलंकार 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी व त्यांचे सहकारी सतत स्वातंत्र्यवीरांचा अपमान करण्याचा प्रकार करत आहे.  चुकीचा इतिहास जनतेसमोर मांडण्याचा प्रकार कॉंग्रेस कडून सातत्याने घडत असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. स्वातंत्रवीर सावरकर यांचा खरा इतिहास जनते समोर आणण्याकरिता व त्यांच्या सन्मानार्थ भारतीय जनता पक्ष व शिवसेनेच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रभर स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर सन्मान गौरव यात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार अकोला शहरासह जिल्हयात मंगळवारी गौरव यात्रा काढण्यात आली. भाजपा शिवसेना पदाधिकारी कार्यकर्तांसह हजारों सावरकर प्रेमी यात्रेत सहभागी झाले होते.




स्वातंत्र्य संग्रामात वि. दा. सावरकर यांची महत्त्वाची कामगिरी असून त्यांच्या सन्मानार्थ अकोला जिल्ह्यात 4 एप्रिल मंगळवार रोजी सायंकाळी अकोला पश्चिम विधानसभा क्षेत्रातील जुने शहर डाबकी रोड परिसरातील जागृत क्षेत्र श्री रेणुका माता मंदिर जवळील स्वातंत्र्यवीर वि दा सावरकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या उपस्थितीत सावरकर सन्मान यात्रा निघाली. आमदार रणधीर सावरकर, ज्येष्ठ नेते विजय अग्रवाल यांच्या हस्ते झेंडी दाखवून गौरव यात्रेला सुरुवात करण्यात आली. यावेळी जयंत मसने, राजू नेरकर, सतीश ढगे, डॉ अशोक ओलंबे आदी पदाधिकारी उपस्थित होते.






अशी निघाली यात्रा 


कस्तुरबा गांधी रुग्णालय मार्ग, श्रीवास्तव चौक ते श्री विठ्ठल मंदिर मार्ग जय हिंद चौक, सिटी कोतवाली चौक, अकोट स्टैंड रोड , श्री अग्रसेन महाराज चौक मार्गी अकोला पूर्व मतदार संघात दुर्गा चौक- गणेश स्वीट मार्ट - राऊत वाडी रोड बारा ज्योतीलिंग मंदिर - जवाहर नगर चौक सिव्हिल लाइन चौक- नेहरू पार्क चौक - अशोक वाटिका चौक, नवीन बस स्टैंड चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह पर्यंत ही यात्रा निघाली. यात्रेत हजारो स्त्री पुरुष भगवे ध्वज घेवून मोटासायकलवर  स्वार होते.


भारत माता की जय, स्वातंत्र्यवीर सावरकर अमर रहे, जय श्रीराम अशा घोषणानी यात्रा मार्ग दणाणून गेला होता. स्वातंत्रवीर सावरकर यांची आकर्षक रथावरील प्रतिमा सोबतच सजीव देखावा लक्ष वेधून घेत होते.यात्रेचे स्वागत फुलांचा वर्षाव आणि आतिषबाजी करीत ठिकठिकाणी करण्यात आले.





स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्राचा समारोप भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह येथे झाला. याठिकाणी प्रखर वक्ते सतीश फडके यांचे वि. दा. सावरकर यांच्या विषयी व्याख्यान आयोजित केले होते.







स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या गौरव यात्रेत समाजातील सर्व घटक सहभागी होणे व जिल्ह्यात अकोला, बार्शीटाकळी मुर्तीजापुर, तेल्हारा, अकोट येथे मिळालेल्या जनतेचा प्रेम विश्वास नरेंद्र मोदी व सावरकर यांच्या विचारसरणीचा विजय असल्याचे प्रतिपादन भाजपा प्रदेश सरचिटणीस  आमदार रणधीर सावरकर यांनी केले.



रेणुका नगर स्थित बाबळेश्वर चौकात बाबळेश्वर मंदिर मंदिरात व स्वातंत्र्यवीर वि दा सावरकर यांना अभिवादन करून पुतळ्याचे पूजन करून अकोला शहरात आज चार एप्रिल मंगळवार रोजी भव्य दिव्य भाजपा शिवसेना युतीच्या वतीने सावरकर गौरव यात्रा  शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.  



या यात्रेत हजारो राष्ट्र प्रेमी नागरिक होऊन 70 ठिकाणी प्रतिमेचे पूजन करण्यात आले भाजपा महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल या यात्रेचे नियोजन संयोजक होते. 


यात्रेचे स्वागत




अकोला महानगर येथे "स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा" बाईक रॅली व्दारे श्री रेणुका माता मंदिर, डाबकी रोड येथून प्रारंभ झाला

यावेळी माजी नगर सेविका तथा माजी उप महापौर वैशाली शेळके यांच्या घरा जवळ पुष्प वृष्टी,माजी नगर सेवक योगेशजी गोतमारे यांच्या घरा जवळ पुष्प वृष्टी, सूनील डीडोळकर यांच्या तर्फे मदर दूध डेअरी जवळ पुष्प वृष्टी, माजी नगर सेवक  शशी चोपडे ,मदन चोपडे यांच्या तर्फे रुद्र फिटनेस सेंटर जवळ पुष्प वृष्टी व आतिष बाजी,डाबकी रोड वाशी मित्र मंडळ तर्फे साई लहरी कन्स्ट्रक्शन जवळ पुष्प वृष्टी व आतिष बाजी,पंडित दीनदयाळ संस्थे तर्फे संजय मेडीकल समोर पुष्प वृष्टी ब आतिष बाजी,अतुल येडणे  यांच्या तर्फे शिवादल चौक येथे आतिष बाजी व स्वागत, निलेश निनोरे यांच्या तर्फे मुरली स्वीट मार्ट जवळ आतिष बाजी,प्राची अंकुश गंगाखेडकर यांच्या तर्फे पुष्प वृष्टी आतिष बाजी, भिरड हॉटेल जवळ मोहनजी भिरड यांच्या तर्फे पुष्प वृष्टी व आतिष बाजी, निरज मिश्रा यांच्या तर्फे श्रीवास्तव चौक येथे पुष्प वृष्टी, श्री विठ्ठल मंदिर अखंड हरिनाम सप्ताह मंडळ जुने शहर अकोला तर्फे स्वागत व पुष्प वृष्टी  गोवर्धन शर्मा आमदार सर्वसेवाधिकारी, रमेश अलकरी व्यवस्थापक, श्री बाराभाई गणेशोत्सव मंडळ राहुल इंगळे यांच्या तर्फे जयहिंद चौक येथे पुष्प वृष्टी व आतिष बाजी, मनोज उर्फ पप्पूभाऊ वानखेडे यांच्या तर्फे घरा जवळ स्वागत व पुष्प वृष्टी,श्री अग्रसेन चौक - सारिका जयस्वाल ,रुपेश  जयस्वाल,व  आरती घोगलिया,  प्रकाश घोगलिया - स्वागत, श्री दुर्गा चौक -  राहुल देशमुख व निकिता देशमुख -पुष्पवृष्टी, श्रीगणेश स्वीट मार्ट चौक-  गीतांजली शेगोकार ,सागरभाऊ शेगोकार व महिला वृंद - स्वागत, श्री बारा ज्योतिर्लिंग मंदिर-  ॲड सुभाषसिंग ठाकूर- बारा ज्योतिर्लिंग संस्थान -रांगोळी व पुष्पवृष्टी,जवाहर नगर चौक-  श्री योगेशभाऊ मानकर जगदंबा प्रतिष्ठान -पुष्पसृष्टी, रणपिसे नगर चौक-  रश्मीताई अवचार व  प्रशांतभाऊ अवचार - स्वागत, बँक ऑफ महाराष्ट्र सिव्हिल लाईन्स-  संजय गोडा, अंबे माता मंदिर प्रतिष्ठान- पाणी व्यवस्था, पुष्पवृष्टी ,आणि रांगोळी, सिव्हिल लाईन चौक- सुनीताताई अग्रवाल,  अनिल  मुरूमकार,  आशिष पवित्रकार  - पुष्पवृष्टी करण्यात आली.




स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेचा  शिवसेनेच्या वतीने जठार पेठ चौक- अनिल चांडक श्री गणेश स्वीट मार्ट ,नेहरू पार्क चौक-योगेश अग्रवाल हॉटेल मिर्ची मसाला,तिलक रोड - दिपक वोरा हॉटेल अलबेला, सिंधी कॅम्प श्री संजय थावरानी, रुद्र जिम चोपडे कॉम्प्लेक्स डाबकी रोड- शशिकांत चोपडे, भिरड रेस्टॉरंट डाबकी रोड- योगेश भिरड ऋषी भिरड, भरत कोल्ड्रिंक्स गांधी रोड- अमित केजरीवाल मध्य मंडळाच्या महिला आघाडीच्या वतीने सिटी कोतवाली येथील महाराणा प्रताप चौक, मोठ्या राम मंदिरावर रामनगर मित्र मंडळ, विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स आणि महेश्वरी समाजाच्या वतीने तिलक रोड गणपती मंदिराजवळ, चंद्रशेखर आजाद चौक मालीपुरा मित्र मंडळ अकोट स्टॅन्ड संतोषी माता मंदिर परिसर फेरीवाल्यांच्या वतीने ऑटो युनियनच्या वतीने ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.





यात्रेत आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा ,आमदार वसंत खंडेलवाल, भाजपा महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल, अनुप धोत्रे,   वसंत बाछुका, जयंत मसने, अर्चना मसने, पांडे गुरुजी, किशोर मालोकार, श्रावण इंगळे, गिरीश जोशी,किशोर पाटील तेजराव थोरात, माधव मानकर,  मिलिंद राउत,  तसेच मंडळाचे पदाधिकारी विविध आघाडीचे प्रमुख प्रमुख नेते तसेच शिवसेनेचे नेते  अश्विन नवले, संदीप पाटील,  सुमन गावंडे,  योगेश अग्रवाल, निखिल ठाकूर, शशी चोपडे तसेच सावरकर प्रेमी राष्ट्रभक्त नागरिक विविध संस्थेचे पदाधिकारी सहभागी तालुका तसेच महानगरातील पदाधिकारी सावरकर प्रेमी नगरसेवक विविध आघाडीचे प्रमुख यात्रेत सहभागी झाले.  


यात्रेचे स्वागत  ठीक ठिकाणी रांगोळी आतिषबाजी ढोल पथक यांनी यात्रेचे स्वागत केले. भाजपाचे लोकप्रतिनिधी कार्यकर्ते सह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 



यात्रेत संतोष पांडे, संजय जीरापुरे संजय गोडफोडे सजय गोडा, अंबादास उमाळे, एडवोकेट देवाशिष काकड, गणेश अंधारे, राजेश बेले, डॉक्टर अशोक ओळंबे, विलास शेळके, राजेंद्र गिरी, उमेश गुजर, वैभव मेहरे, संजय जोशी, अक्षय जोशी , सागर शेगोकार, गीतांजली शेगोकार, हरीश काळे, हरिभाऊ काळे, संदीप  गावंडे, अनिल नावकर,  प्रशांत अवचार, रश्मी अवचार, सुभाष खंदारे, राहुल देशमुख, सारिका जैस्वाल, रुपेस जैस्वाल, आरती घोग्लीया, प्रकाश घोग्लीया, अनिल गिरी, श्याम  विंचनकर, तुषार भिरड, अजय शर्मा, अनिल मुरुमकर, सुनिता अग्रवाल, आकाश ठाकरे, आशिष पवित्रकर, प्रवीण जगताप, विशाल इंगळे, गोपाल मुळे, नितीन गवळी, धरमकर,  दिलीप भरणे, दिलीप मिश्रा, अनिल गोगे, जयश्री दुबे, वैकुंठ ढोरे,  प्रवीण हगवणे, भरत कालमेघ, देवेंद्र देवर,  शारदा ढोरे, विनोद मापारी, रणजीत खेडकर, विजय इंगळे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.. 




राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्या विरोधात व त्यांचा अपमान करण्याचा प्रकार कोणी केल्यास तो सहन केल्या जाणार नाही असाही इशारा आमदार सावरकर यांनी यावेळी दिला.  स्वस्त पब्लिसिटी साठी स्टंटबाजी करणे सोपे आहे त्यांचा जनता वेळ आल्यावर योग्य समाचार घेतील  भाजपाला बदनाम करण्याचा प्रयत्न जिल्ह्यात यशस्वी होणार नाही नाटकबाजी पेक्षा विकास कामासाठी पुढाकार घ्या , असे विजय अग्रवाल यांनी यावेळी सांगितले.


टिप्पण्या